Cooch Behar Trophy Dainik Gomantak
क्रीडा

Cooch Behar Trophy: गोव्याविरुद्ध पंजाबने उभारली मोठी धावसंख्या; राहुल आणि क्रिशची शानदार भागिदारी!

Cooch Behar Trophy: कूचबिहार करंडक (19 वर्षांखालील) स्पर्धेत पंजाबने तीन अर्धशतकांच्या बळावर गोव्याविरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवसाअखेर भक्कम स्थिती गाठली.

किशोर पेटकर

Cooch Behar Trophy: कूचबिहार करंडक (19 वर्षांखालील) स्पर्धेत पंजाबने तीन अर्धशतकांच्या बळावर गोव्याविरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवसाअखेर भक्कम स्थिती गाठली. अ गटातील चार दिवसीय सामन्याला शुक्रवारी पतियाळा येथील ध्रुव पांडोव क्रिकेट स्टेडियमवर सुरवात झाली.

पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, मात्र त्यांचा डाव 4 बाद 78 असा गडगडला. मात्र नंतर राहुल कुमार (66), क्रिश भगत (55) व अर्जुन राजपूत (नाबाद 77) यांच्या अर्धशतकामुळे पहिल्या दिवशी खेळ थांबला तेव्हा यजमान संघाने 7 बाद 316 धावा केल्या.

दरम्यान, राहुल आणि क्रिश यांनी पाचव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी करुन पंजाबला दीडशतकी टप्पा गाठून दिला. नंतर अर्जुन आणि कर्णधार क्रिश यांच्यातील सहाव्या विकेटची 100 धावांची भागीदारी पंजाबसाठी महत्त्वपूर्ण ठरली. नंतर सातव्या विकेटसाठी अर्जुन याने उदय कक्कर (35) याच्यासमवेत 62 धावांची भागीदारी केल्यामुळे पंजाबने त्रिशतकी धावसंख्या ओलांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

Sattari water Isuue: दूषित पाणीप्रकरणी आयोग सक्रिय; सत्तरीत स्वतःहून चौकशी, संबंधित विभागांना नोटीस

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

SCROLL FOR NEXT