Argentina Football Team  Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022: फाईव्हस्टार हॉटेल सोडून कतार विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये का राहतोय मेस्सीचा अर्जेंटिना संघ?

आचाऱ्यासह अर्जेंटिनात मिळणारे खास मांसही संघाने सोबत आणले

Akshay Nirmale

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेला काही तासातच सुरवात होत आहे. तथापि, त्यामुळे शनिवारीपर्यंतच स्पर्धेत सहभागी सर्व सहभागी संघ कतारमध्ये दाखल झाले आहेत. फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीचा अर्जेटिना संघ तर गुरूवारीच कतारमध्ये दाखल झाला, पण मेस्सीच्या संघाने हॉटेलमध्ये राहण्यास नकार दिला.

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्यास नकार देत अर्जेंटिना संघाने येथील कतार विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये राहण्यास प्राधान्य दिले. अर्थात ही गोष्ट विचित्र वाटू शकते, की फाईव्ह स्टार हॉटेल सोडून अर्जेंटिना संघ इतर ठिकाणी का राहणार आहे? त्याचे कारणही समोर आले आहे. संघाला कतारमध्ये देखील घरासारखे वाटावे, म्हणून संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.

अर्जेंटिनाच्या या पथकासोबत त्यांच्या देशात मिळणारे खास मटण आणि एक आचारी देखील कतारमध्ये आला आहे. अर्जेंटिनाचे खास पदार्थ बनविण्यासाठीच या आचाऱ्यालाही संघाने सोबत आणले आहे. कतारमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असे करण्यास मनाई आहे. त्यामुळे परवानगी नसल्याने अर्जेंटिना संघाने विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, कतार विद्यापीठाचे हॉस्टेलदेखील एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही. येथे 90 खोल्या आहेत. आणि सर्व सुविधा उपलब्ध आहेत. येथे एक ऑलिंपिक साईज स्विमिंग पुलदेखील आहे. याशिवाय 10 हजार प्रेक्षक क्षमता असलेले एक फुटबॉल स्टेडियमदेखील आहे.

अर्जेंटिना फुटबॉल संघातील सुत्रांनी सांगितले की, आम्ही येथे यापुर्वीही आलो आहे. आम्ही हॉस्टेलची निवड याच कारणासाठी केली आहे, जेणेकरून खेळाडूंना मोकळे वातावरण मिळेल. आम्हाला घरासारखे वाटले पाहिजे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. आमचा संघ सर्वोत्तम आहे आणि आम्हाला सर्वोत्तमच गोष्टी हव्या आहेत. आमचे लक्ष वर्ल्डकप जिंकण्यावर आहे, हॉटेलवर नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

SCROLL FOR NEXT