ICC World Cup Cricket News : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी असा इशारा दिला आहे की देशांतर्गत टी-20 लीगच्या वाढत्या संख्येमुळे द्विपक्षीय मालिका कमी होत आहेत आणि पुढील दशकात कसोटी सामन्यांची संख्या कमी होऊ शकते.
नोव्हेंबर 2020 मध्ये आयसीसीचे अध्यक्ष बनलेल्या बार्कले यांनी सांगितले की, पुढील वर्षापासून सुरू होणाऱ्या दौऱ्याचे वेळापत्रक ठरवताना आयसीसीला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. 'मॅच स्पेशल' कार्यक्रमात ते म्हणाले, दरवर्षी महिला आणि पुरुष क्रिकेटची स्पर्धा असते. याशिवाय देशांतर्गत लीग वाढत आहे. त्यामुळे द्विपक्षीय मालिका लहान होत आहेत. (ICC World Cup Cricket News)
ते पुढे म्हणाले, याचे दुर्दैवी परिणाम होतील. तसेच खेळण्याच्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून आणि ज्या देशांना जास्त खेळण्याची संधी मिळत नाही, अशा देशांच्या कमाईच्या दृष्टिकोनातून, विशेषतः भारत, ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडसारख्या संघांविरुद्ध.
पुढील 10-15 वर्षांत कसोटी क्रिकेट हा खेळाचा अविभाज्य भाग राहील पण सामन्यांची संख्या कमी होऊ शकते. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या देशांवर त्याचा परिणाम होणार नाही, असेही त्यांनी सूचित केले.
महिला क्रिकेटमध्ये कसोटीचे स्वरूप तितक्या वेगाने विकसित होत नसल्याचेही बार्कले यांनी सांगितले. ते म्हणाले, कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी देशांतर्गत रचना अशी असावी जी कोणत्याही देशात नाही. महिला क्रिकेटमध्ये कसोटीचे स्वरूप वेगाने विकसित होत आहे, असे मला वाटत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.