U19 Cricket World Cup Winners and Runner-up X/ICC
क्रीडा

U19 World Cup: ऑस्ट्रेलिया भारताचा पराभव करत चौथ्यांदा जगज्जेते! पाहा आत्तापर्यंतचे सर्व विजेते अन् उपविजेते संघ

U19 World Cup Winners and Runner-Up: 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेतील आत्तापर्यंतचे सर्व विजेत्या आणि उपविजेत्या संघाची संपूर्ण यादी

Pranali Kodre

ICC U19 Men’s Cricket World Cup Winners and Runner Up teams list

रविवारी (11 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेतील बेनोनीमधील विलोमूर पार्क येथे 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे युवा संघ आमने-सामने होते.

या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 79 धावांनी विजय मिळवत विजेतेपदाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा 19 वर्षांखालील वर्ल्डकपवर नाव कोरले आहे.

ऑस्ट्रेलियाने 2024 पूर्वी 1988, 2002 आणि 2010 साली 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत 2012 आणि 2018 साली उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. विशेष म्हणजे या दोन्हीवेळी अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते.

यंदाचे 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेचे 15 वे पर्व होते. आत्तापर्यंत झालेल्या 15 पर्वात सर्वाधिक विजेतेपद जिंकण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर असून त्यांनी 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 या वर्षी झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्डकपचे विजेतेपद जिंकले आहे. तसेच भारताने 2024 पूर्वी 2006, 2016 आणि 2020 साली उपविजेतेपदावर समाधान मानले आहे.

19 वर्षांखालील वर्ल्डकपचे आत्तापर्यंतचे विजेते आणि उपविजेते

1988:

विजेता - ऑस्ट्रेलिया , उपविजेता - पाकिस्तान

1998:

विजेता - इंग्लंड , उपविजेता - न्यूझीलंड

2000:

विजेता - भारत, उपविजेता - श्रीलंका

2002:

विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - दक्षिण आफ्रिका

2004:

विजेता - पाकिस्तान, उपविजेता - वेस्ट इंडिज

2006:

विजेता - पाकिस्तान, उपविजेता - भारत

2008:

विजेता - भारत, उपविजेता - दक्षिण आफ्रिका

2010:

विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - पाकिस्तान

2012:

विजेता - भारत, उपविजेता - ऑस्ट्रेलिया

2014:

विजेता - दक्षिण आफ्रिका, उपविजेता - पाकिस्तान

2016:

विजेता - वेस्ट इंडिज, उपविजेता - भारत

2018:

विजेता - भारत, उपविजेता - ऑस्ट्रेलिया

2020:

विजेता - बांगलादेश, उपविजेता - भारत

2022:

विजेता - भारत, उपविजेता - इंग्लंड

2024:

विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - भारत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT