India vs Australia | U19 World Cup 2024 Final | Uday Saharan and Hugh Weibgen  ICC
क्रीडा

U19 World Cup: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस! फायनलसाठी अशी आहे दोन्ही टीमची 'प्लेइंग-11'

U19 World Cup, India vs Australia Final: 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होत आहे.

Pranali Kodre

ICC U19 Men’s Cricket World Cup 2024, India vs Australia, Playing XI:

रविवारी (11 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे युवा संघ आमने-सामने आहेत. बेनोनीमध्ये होणाऱ्या या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ह्यु वेबगेनने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. ऑस्ट्रेलियाने टॉम कॅम्पबेलच्या जागेवर चार्ली अँडरसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

तसेच भारताने मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. त्यामुळे उपांत्य सामन्यात खेळलेले भारताचे 11 खेळाडूच अंतिम सामन्यातही संघात कायम आहेत.

दरम्यान, भारताने सलग पाचव्यांदा 19 वर्षांखालील वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने एकूण सहाव्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

त्याचबरोबर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे युवा संघ 19 वर्षांखालील वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात एकूण तिसऱ्यांदा आमने-सामने आले आहेत.

यापूर्वी 2012 आणि 2018 साली झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही हे दोन संघ आमने-सामने होते. दोन्ही वेळी भारताने विजय मिळवत विजेतेपद जिंकले होते.

भारतीय संघ या स्पर्धेत गतविजेता म्हणूनही खेळत आहे. यंदा भारतीय संघ सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याच्या हेतूने उतरला आहे, तर ऑस्ट्रेलिया 14 वर्षांनी आणि एकूण चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी खेळत आहेत.

भारताने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 या वर्षी झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्डकपचे विजेतेपद जिंकले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत 1988, 2002 आणि 2010 साली 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनिश (यष्टीरक्षक), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी, सौम्य पांडे

  • ऑस्ट्रेलिया - हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), हरजस सिंग, रायन हिक्स (यष्टीरक्षक), ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन, कॅलम विडलर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT