U19 team India X/ACCMedia1
क्रीडा

U19 World Cup: बांगलादेशने जिंकला टॉस, भारताची पहिली बॅटिंग; कुठे आणि कसा पाहाणार सामना, घ्या जाणून

India U19 vs Bangladesh U19: 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेत शनिवार भारत आणि बांगलादेश संघात सामना होणार आहे.

Pranali Kodre

ICC U19 Cricket World Cup 2024, U19 India vs U19 Bangladesh:

शुक्रवारपासून (19 जानेवारी) 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत गतविजेत्या 19 वर्षांखालील भारतीय संघाचा पहिला सामना शनिवारी (20 जानेवारी) 19 वर्षांखालील बांगलादेश संघाविरुद्ध होत आहे.

हा सामना ब्लोएमफाँटेनला होणार असून या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या स्पर्धेत भारताचे नेतृत्व उदय सहारन करत आहे, तसेच बांगलादेशचे नेतृत्व महफुझर रेहमान रब्बी करत आहेत.

दरम्यान, भारतीय संघाने पाचवेळा 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला आहे, तर बांगलादेशने 2020 साल भारताला अंतिम सामन्यात पराभूत करत वर्ल्डकप जिंकला होता.

शनिवारी होणाऱ्या सामन्याने भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ या स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत.

कुठे आणि केव्हा पाहाणार सामना?

19 वर्षांखालील वर्ल्डकपमधील भारत आणि बांगलादेश यांच्यात होणारा सामना भारतात टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर दिसणार आहे. तसेच डिज्नी + हॉटस्टार या ऍप आणि वेबसाईटवरही सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

भारत - आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, उदय सहारन (कर्णधार), मुशीर खान, सचिन धस, प्रियांशू मोलिया, अरावेल्ली अवनिश,मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी, सौम्य पांडे.

बांगलादेश - आशिकुर रहमान शिबली (यष्टीरक्षक), जिशान आलम, चौधरी मोहम्मद रिझवान, अरिफुल इस्लाम, अहरार अमीन, मोहम्मद शिहाब जेम्स, महफुजुर रहमान रब्बी (कर्णधार), शेख पावेझ जिबोन, मोहम्मद इक्बाल हुसेन एमोन, मारुफ मृधा, रोहनत दौल्ला बोरसन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT