Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

ICC T20 Ranking: सूर्या बनला T20 चा बॉस, पाक खेळाडूची संपवली बादशाहत

Suryakumar Yadav: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला आहे.

दैनिक गोमन्तक

ICC T20I Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला आहे.

दरम्यान, सूर्यकुमारने पाकिस्तानचा (Pakistan) सलामीवीर मोहम्मद रिझवानला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणारा तो केवळ दुसरा भारतीय फलंदाज आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय पदार्पणापासून त्याने भारतीय संघाला (Team India) अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले आहेत.

तसेच, सूर्यकुमारने भारतासाठी (India) 37 टी-20 सामन्यांमध्ये एक शतक आणि 11 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याने 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सूर्यकुमारला 863 तर रिझवानला 842 गुण आहेत. न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे 792 गुणांसह पहिल्या तीनमध्ये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT