Marnus Labuschagne

 

Dainik Gomantak 

क्रीडा

ICC Rankings: मार्नस लॅबुशेन 20 कसोटी खेळून बनला नंबर वन !

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne) हा कसोटी क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज बनला आहे.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne) हा कसोटी क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज बनला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत त्याने हे स्थान मिळवले. मार्नस लॅबुशेनने इंग्लंडचा कर्णधार जो रुटला (joe root) मागे टाकून अव्वल स्थान गाठले आहे. त्याचे आता 912 रेटिंग गुण आहेत तर जो रुट 897 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne) प्रथमच कसोटीत नंबर वन फलंदाज बनला आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि आतापर्यंत फक्त 20 कसोटी सामने खेळला आहे. मार्नस लॅबुशेनचा नंबर वन कसोटी फलंदाज बनण्याची कहाणीही दमदार आहे.

मार्नस लॅबुशेनने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत सहा शतके आणि 12 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची धावण्याची सरासरी 62.14 आहे. किमान 20 कसोटी खेळलेल्या फलंदाजांच्या धावण्याच्या सरासरीच्या बाबतीत मार्नस लॅबुशेन डॉन ब्रॅडमनच्या मागे आहे. ब्रॅडमन यांनी 99.94 च्या सरासरीने धावा केल्या. लॅबुशेनला 2014 मध्येच कसोटी क्रिकेटचा पहिला अनुभव आला होता. त्यानंतर वयाच्या 20 व्या वर्षी भारताविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये तो पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरला. त्यावेळी त्याने नॅथन लायनच्या (nathan lyon) चेंडूवर वरुण आरोनचा अप्रतिम झेल घेतला होता.

तथापि, त्याचे कसोटी पदार्पण ऑक्टोबर 2018 मध्ये पाकिस्तानविरुद्ध दुबई कसोटीत झाले. पदार्पणाची कसोटी लॅबुशेनसाठी संस्मरणीय ठरली नव्हती. पहिल्या डावात तो खाते न खोलता दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्याचवेळी त्याला दुसऱ्या डावात 13 धावा करता आल्या. या मालिकेनंतर लॅबुशेनची कसोटी क्रमवारी 110 व्या स्थानावर आहे.

दरम्यान, त्यानंतर मार्नस लॅबुशेन 2018 साली भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीत खेळण्यासाठी मैदानात उतरला. त्यानंतर तो तिसऱ्या क्रमाकांवर खेळण्यासाठी उतरला. या कसोटीत त्याने 38 धावा केल्या. भारताविरुद्धच्या मालिकेनंतर पुढच्या दोन कसोटीत त्याने 81 आणि सहा धावा केल्या. यानंतर तो रँकिंगमध्ये 95 स्थानावर होता. डेव्हिड वॉर्नर (david warner) आणि स्टीव्ह स्मिथ संघाबाहेर असताना लॅबुशेनने या कसोटी खेळल्या होत्या. हे दोघे परत आले तेव्हा लॅबुशेन प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर होता.

परंतु 2019 च्या ऍशेस मालिकेत, लॉर्ड्स कसोटीत दुखापत झाल्यामुळे स्टीव्ह स्मिथने विश्रांती घेतली होती. त्याच्या जागी लॅबुशेनला संधी मिळाली. त्याने त्याचा पुरेपूर फायदा उठवत 59 धावांची धडाकेबाज खेळी उभारली.

तसेच, अॅशेस मालिकेत लॅबुशेनने 50.42 च्या सरासरीने धावा करत चार अर्धशतके ठोकली. या कामगिरीमुळे तो क्रमवारीत 35 व्या स्थानावर आला आहे. यानंतर लबुशेनला रोखणे कठीण झाले. 2019-20 च्या उन्हाळ्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध 185 आणि 162 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध 143 धावांची खेळी करत त्याने दोन अर्धशतकेही ठोकली. अशाप्रकारे चार शतके आणि तीन अर्धशतकांच्या मदतीने त्याने उन्हाळ्यात 112 च्या सरासरीने 896 धावा केल्या. 2019 मध्ये, त्याची कसोटी सरासरी 20.25 होती, जी जानेवारी 2020 पर्यंत वाढून 63.43 झाली. यासोबतच तो क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला.

शिवाय, 2020 च्या अखेरीस जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला तेव्हा फक्त मार्नस लॅबुशेन भारतासमोर उभा राहू शकला. सिडनी कसोटीत त्याने 91 आणि 73 धावा केल्या. त्याने ब्रिस्बेनमध्ये शतक ठोकले. मात्र भारताने मालिका जिंकली. आता इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेतही त्याची बॅट चमकली आणि तो क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला. इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिका सुरु होण्यापूर्वी तो चौथ्या क्रमांकावर होता. यानंतर ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत 74 धावांच्या खेळीमुळे तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्यानंतर अॅडलेडमधील दुसऱ्या कसोटीत त्याने एक शतक आणि अर्धशतक झळकावले. यासह ते शीर्षस्थानी पोहोचला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT