Australia Team Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा कोरलं वर्ल्डकपवर नाव! पाहा आत्तापर्यंतचे सर्व विजेते अन् उपविजेते संघ

World Cup 2023 Final: वनडे वर्ल्डकपमधील सर्व विजेत्या आणि उपविजेत्या संघांची लिस्ट

Pranali Kodre

ICC ODI World Cup Winners and Runner Up teams list:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात अंतिम सामना झाला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने तब्बल सहाव्यांदा वर्ल्डकपला गवसणी घातली.

त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या नावावर सर्वाधिकवेळा वर्ल्डकप जिंकण्याचा विक्रम आणखी भक्कम झाला आहे. ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपमध्ये आठ वेळा अंतिम सामना खेळला असून सहावेळा विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाने 1975, 1987, 1996, 1999, 2003, 2007, 2015 आणि 2023 साली वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला आहे. यातील 1987, 1999, 2003, 2007, 2015 आणि 2023 साली ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला आहे.

तसेच भारताला दुसऱ्यांदा वर्ल्डकप स्पर्धेत उपविजेतेपद जिंकले आहे. यापूर्वी भारताने 2003 साली वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभव स्विकारला होता, त्यावेळीही भारताला ऑस्ट्रेलियानेच पराभूत केले होते. तसेच भारताने 1983 आणि 2011 साली भारताने वर्ल्डकप जिंकला होता.

वनडे वर्ल्डकपचे विजेते आणि उपविजेते संघ -

1975 वर्ल्डकप :

  • विजेता - वेस्ट इंडिज, उपविजेता - ऑस्ट्रेलिया

1979 वर्ल्डकप :

  • विजेता - वेस्ट इंडिज, उपविजेता - इंग्लंड

1983 वर्ल्डकप :

  • विजेता - भारत, उपविजेता - वेस्ट इंडिज

1987 वर्ल्डकप :

  • विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - इंग्लंड

1992 वर्ल्डकप :

  • विजेता - पाकिस्तान, उपविजेता - इंग्लंड

1996 वर्ल्डकप :

  • विजेता - श्रीलंका, उपविजेता - ऑस्ट्रेलिया

1999 वर्ल्डकप :

  • विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - पाकिस्तान

2003 वर्ल्डकप :

  • विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - भारत

2007 वर्ल्डकप :

  • विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - श्रीलंका

2011 वर्ल्डकप :

  • विजेता - भारत, उपविजेता - श्रीलंका

2015 वर्ल्डकप :

  • विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - न्यूझीलंड

2019 वर्ल्डकप :

  • विजेता - इंग्लंड, उपविजेता - न्यूझीलंड

2023 वर्ल्डकप :

  • विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - भारत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa Live Updates: गोव्याचा सन्मान! बेस्ट कोस्टल स्पिरीट शोकेस पुरस्काराने गौरव

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

Goa Politics: ''महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक...''; सरदेसाईंचा घणाघात

SCROLL FOR NEXT