Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळताच किंग कोहली करणार मोठा कारनामा, क्रिकेटचा देव 'या' लिस्टमध्ये अव्वल!

ICC ODI World Cup 2023: विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

Manish Jadhav

ICC ODI World Cup 2023: विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. यावेळी विश्वचषकात अनेक दिग्गज खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे.

त्यात विराट कोहली, रोहित शर्मा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा आदी नावांचा समावेश आहे. मात्र, या सर्वांमध्ये विराट कोहली हा एकमेव खेळाडू असेल जो चौथा विश्वचषक खेळणार आहे.

विराट कोहली चौथा विश्वचषक खेळणार आहे

दरम्यान, या विश्वचषकाचा पहिला सामना खेळताच अनुभवी क्रिकेटपटू विराट कोहली 4 वेळा विश्वचषक खेळण्याचा विक्रम करणार आहे. या यादीत आधीच अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी तिसरा विश्वचषक खेळला आहे.

चार विश्वचषक खेळलेल्या खेळाडूंमध्ये कपिल देव, सुनील गावसकर, अनिल कुंबळे, एमएस धोनी आदी नावांचा समावेश आहे. आता या यादीत विराट कोहलीचेही (Virat Kohli) नाव जोडले जाणार आहे.

सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर आहे

अनुभवी माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या कारकिर्दीत एकूण सहा एकदिवसीय विश्वचषक खेळल्यानंतर या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

याशिवाय, रिकी पाँटिंग, महेला जयवर्धने, जॅक कॅलिस यांच्यासह अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत प्रत्येकी पाच एकदिवसीय विश्वचषक खेळले आहेत.

वयाच्या 22 व्या वर्षी पहिला एकदिवसीय विश्वचषक खेळला

विराट कोहलीने 2011 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी पहिला एकदिवसीय विश्वचषक खेळला होता. त्याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या विश्वचषक सामन्यात 100* (83) धावा करुन शानदार शतक केले.

यानंतर विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार 59 धावा केल्या आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध महत्त्वपूर्ण 35 (49) धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT