Mitchell Santner Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: मिचेल सँटनरची अष्टपैलू कामगिरी, युवराज सिंगसोबत बनला 'या' खास क्लबचा भाग

Mitchell Santner: न्यूझीलंडसाठी दुसऱ्या सामन्यात फिरकीपटू मिचेल सँटनरने बॅट आणि बॉलने अप्रतिम कामगिरी केली.

Manish Jadhav

World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये जर एखाद्या संघाने सर्वाधिक प्रभावित केले असेल तर तो न्यूझीलंड संघ आहे.

नियमित कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीतही किवी संघाने इंग्लंड आणि नंतर नेदरलँड्सविरुद्ध एकतर्फी विजयाची नोंद केली.

न्यूझीलंडसाठी दुसऱ्या सामन्यात फिरकीपटू मिचेल सँटनरने बॅट आणि बॉलने अप्रतिम कामगिरी केली. किवी संघाने हा सामना 99 धावांनी जिंकला आणि गुणतालिकेत 4 गुणांसह पहिले स्थान पटकावले.

मिचेल स्टार्कने 36 धावा केल्या आणि 5 विकेट घेतल्या

दरम्यान, नेदरलँड्सविरुद्धच्या (Netherlands) सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 254 धावांवर सहा विकेट गमावल्या होत्या. येथून सँटनरने टॉम लॅथमसह सातव्या विकेटसाठी 27 चेंडूत 39 धावांची भागीदारी केली.

यानंतर सँटनरने मॅट हेन्रीसह आठव्या विकेटसाठी अवघ्या 9 चेंडूत 29 धावा जोडल्या. मिचेल सँटनरच्या 36 धावांच्या खेळीच्या जोरावर किवी संघाला 50 षटकांत 322 धावांपर्यंत मजल मारता आली. यानंतर सँटनरने बॉलिंगमध्येही आश्चर्यकारक कामगिरी केली आणि गोलंदाजीच्या 10 षटकांत 5 बळी घेतले.

सँटनर युवराज सिंगसोबत खास क्लबचा भाग बनला

एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात मिचेल सँटनर आता एका सामन्यात 5 बळी घेणारा तिसरा डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे.

याआधी भारताचा माजी खेळाडू युवराज सिंग व्यतिरिक्त बांगलादेश संघाचा विद्यमान कर्णधार शकिब अल हसनच हे करण्यात यशस्वी होऊ शकला. याशिवाय सँटनरने आता न्यूझीलंडसाठी (New Zealand) फिरकी गोलंदाज म्हणून वनडेमध्ये सर्वाधिक 5 बळी घेण्याच्या बाबतीत डॅनियल व्हिटोरीची बरोबरी केली आहे.

सँटनरच्या वनडे कारकिर्दीतील ही दुसरी वेळ होती की, त्याने एका सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत. एका सामन्यात 30 पेक्षा जास्त धावा करणारा आणि 5 बळी घेणारा न्यूझीलंड संघाचा सॅंटनर पहिला खेळाडू ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT