Shubman Gill & Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 Final: रोहित-गिल जोडी 'हिट', गांगुली-तेंडुलकर यांच्या खास क्लबमध्ये सामील!

ODI World Cup 2023 IND vs AUS Final: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.

Manish Jadhav

ODI World Cup 2023 IND vs AUS Final: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय डावाची सुरुवात काही खास झाली नाही, पण तरीही रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने वनडेमध्ये एक खास विक्रम केला आहे. ज्यासोबत ही जोडी आता सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांच्या खास क्लबमध्ये सामील झाली आहे.

रोहित-गिल जोडीच्या नावावर खास विक्रम

दरम्यान, रोहित आणि गिल ही जोडी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्‍ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावांची भागीदारी करणारी जगातील दुसरी जोडी ठरली आहे. यावर्षी रोहित आणि गिलच्या जोडीने एकदिवसीय सामन्यांमध्ये 1523 धावा केल्या आहेत.

या यादीत पहिला क्रमांक सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या सलामीच्या जोडीचा आहे, ज्यांनी 1998 मध्ये 1635 धावा केल्या होत्या. आता या यादीत रोहित आणि गिलची जोडी दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावांची भागीदारी असलेली जोडी

1. सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली (1635 धावा, वर्ष 1998)

2. रोहित शर्मा-शुबमन गिल (1523 धावा, वर्ष 2023)

3. अॅडम गिलख्रिस्ट-मिचेल वाघ (1518 धावा, वर्ष 1999)

4. सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली (1483 धावा, वर्ष 2000)

रोहित-गिल जोडी सामन्याच्या सुरुवातीलाच तुटली

अंतिम सामन्यात टीम इंडियाची (Team India) जोडी लवकरच तुटली आणि शुभमन गिल अवघ्या 4 धावा करुन स्टार्कच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा झटपट डाव खेळून बाद झाला. रोहितने अंतिम सामन्यात 47 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियालाही सामन्याच्या सुरुवातीलाच तिसरा धक्का बसला आणि श्रेयस अय्यरही अवघ्या 4 धावा करुन बाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT