Team India 
क्रीडा

IND vs PAK: 36 धावांत 7 विकेट्स! पाकिस्तानची अशी उडाली दाणादाण, पाहा Video

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Pakistan, All Wickets:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना होत आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात पाकिस्तान संघ 42.5 षटकात 191 धावांवर सर्वबाद झाला.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफिक आणि इमाम-उल-हक यांनी डावाची सुरुवात केली. त्यांनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली होती. पण 8 व्या षटकात मोहम्मद सिराजने शफिकला 20 धावांवर बाद करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला.

त्यानंतर इमामने कर्णधार बाबर आझमला साथीला घेत पाकिस्तानला डाव पुढे नेला होता. मात्र, 13 व्या षटकात हार्दिक पंड्याने इमाम-उल-हकला 36 धावांवर माघारी धाडले. पण यानंतर बाबर आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला.

त्यांनी अर्धशतकी भागीदारीही करत पाकिस्तानला 150 धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र, त्यांची जोडी 30 व्या षटकात मोहम्म सिराजने तोडली. त्याने अर्धशतकी खेळी केलेल्या बाबर आझमला 50 धावांवर त्रिफळाचीत केले.

त्यामुळे बाबर आणि रिझवान यांची 82 धावांची भागीदारीही तुटली. यानंतर मात्र, पाकिस्तानची फलंदाजी कोलमडली. त्यांनी 36 धावांत 7 विकेट्स गमावल्या.

बाबर पाठोपाठ कुलदीप यादवने सौद शकिलला 6 धावांवर 33 व्या षटकात पायचीत पकडले. याच षटकात त्याने इफ्तिखार अहमदलाही 4 धावांवर त्रिफळाचीत केले. त्याच्या पुढच्याच षटकात स्थिरावलेल्या रिझवानला 49 धावांवर जसप्रीत बुमराहने त्रिफळाचीत केले.

36 व्या षटकात शादाब खानला बुमराहने 2 धावांवर त्रिफळाचीत केले, तर 39 व्या षटकात मोहम्मद नवादला हार्दिकने माघारी धाडले. एक बाजू लावून धरलेला हसन अलीही 41 व्या षटकात 12 धावांवर रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. 43 व्या षटकात जडेजानेच हॅरिस रौफला पायचीत करत पाकिस्तानचा डाव संपवला.

या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT