India vs New Zealand BCCI
क्रीडा

World Cup 2023: पावसामुळे नाही, तर धरमशालेत 'या' गोष्टीमुळे थांबलेला भारत-न्यूझीलंड सामना

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात धरमशाला येथे होणारा वर्ल्डकप 2023 सामना काही वेळासाठी थांबवण्यात आला होता.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand, Weather:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना होत आहे. धरमशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होत असून न्यूझीलंडने भारतासमोर 274 धावांचे आव्हान ठेवले आहे. 

या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारतीय संघाने 15.4 षटकात 2 बाद 100 धावा केलेल्या असताना खेळाडू चेंडू दिसत नसल्याची तक्रार करताना दिसले. त्यामुळे अचानक सामना थांबवण्यात आला.

झाले असे की ढग खाली उतरले होते, तसेच बरेच धुके देखील मैदानावर पसरल्याचे दिसत होते. त्याचमुळे हा सामना काही काळासाठी थांबवण्यात आला. पण नंतर वातावरण खेळण्यासाठी चांगले झाल्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला.

दरम्यान, असे ढग खाली उतरल्याने सामना थांबवण्याची ही फार दुर्मिळ घटना आहे. अनेकदा पाऊस किंवा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सामना थांबवला जातो. मात्र, धुक्यामुळे किंवा ढग खाली आल्याने सामन्यात अडथळा फार कमी वेळा आला आहे.

सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी बोलावले होते. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 273 धावा केल्या.

न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने सर्वाधिक 130 धावांची खेळी केली. त्याने 127 चेंडूत ही खेळी करताना 9 चौकार आणि 5 षटकार मारले. तसेच रचिन रविंद्रने 87 चेंडूत 75 धावांची खेळी केली.

तसेच भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT