India vs England X
क्रीडा

World Cup 2023: बटलरने जिंकला टॉस! भारत-इंग्लंड संघाच्या प्लेइंग-11 मध्ये 'या' खेळाडूंना संधी

India vs England: वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत लखनऊला होणाऱ्या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकली आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs England, Playing XI :

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील २९ वा सामना भारत विरुद्ध इंग्लंड संघात रविवारी (२९ ऑक्टोबर) होणार आहे. लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार असून या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे भारताकडून यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध खेळलेलेच ११ खेळाडू आणि इंग्लंडकडून यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध खेळलेलेच ११ खेळाडू या सामन्यातही खेळताना दिसणार आहे.

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा या स्पर्धेतील हा प्रत्येकी सहावा सामना असणार आहे. या सामन्यात विजय मिळवून आपला विजयी रथ कायम दौडवण्याचा भारतीय संघाचा हेतू असेल, तर पुन्हा विजयी लयीत परतण्याकडे आणि आपले आव्हान कायम ठेवण्याचा मानस इंग्लंडचा असेल.

भारताने आत्तापर्यंत पाचपैकी पाचही सामने जिंकले आहे, तसेच इंग्लंडने पाचपैकी एक सामना जिंकला आहे आणि चार सामने हरले आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

  • इंग्लंड - जॉनी बेअरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT