R Ashwin Jasprit Bumrah BCCI
क्रीडा

World Cup 2023: अफगाणिस्तानने जिंकला टॉस! अश्विन भारतीय संघातून बाहेर तर 'या' खेळाडूला संधी; पाहा 'प्लेइंग-11'

India vs Afghanistan: वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सामन्यात बुधवारी अफगाणिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकली आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023 India vs Afghanistan Playing XI:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बुधवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाने मोठा बदल केला आहे. अनुभवी फिरकीपटू आर अश्विनच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. तसेच या सामन्यासाठीही शुभमन गिल उपलब्ध नसल्याने इशान किशन सलामीला फलंदाजी करेल.

त्याचबरोबर नाणेफेकीवेळी रोहितने म्हटले आहे की भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचेच ठरवले होते. त्यामुळे ते खूश आहेत की अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी घेतली. तसेच त्याने आशा व्यक्त केली की पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ज्याप्रामाणे विजय मिळवला त्याप्रमाणे या सामन्यातही विजय मिळेल.

दरम्यान, अफगाणिस्तानने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे त्यांचा बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात खेळलेला संघच या सामन्यातही खेळणार आहे.

बुधवारी होणारा सामना भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांसाठी यंदाच्या स्पर्धेतील दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते, तर अफगाणिस्तानला बांगलादेशकडून पराभवाचा धक्का बसला होता.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

  • अफगाणिस्तान - रहमानउल्ला गुरबाज(यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी(कर्णधार), नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला ओमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT