India vs Australia 
क्रीडा

World Cup 2023: वीस वर्षांनी फायनलमध्ये पुन्हा भिडणार भारत-ऑस्ट्रेलिया, पाहा आत्तापर्यंतचा 'हेड टू हेड' रेकॉर्ड

India vs Australia Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकप 2023 स्पर्धेची फायनल रविवारी अहमदाबादमध्ये रंगणार आहे. दरम्यान आत्तापर्यंत कोणत्या संघाचे वर्चस्व राहिले आहे, जाणून घ्या

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023 Final, India vs Australia, head to head records:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात रंगणार आहे. हा सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात आहे.

विशेष म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांनी आपली यंदाची वर्ल्डकप मोहिम एकमेकांविरुद्धच सुरु केली होती. चेन्नईमध्ये हा सामना झाला होता, त्यात भारताने ६ विकेटने विजय मिळवला होता.

तसेच हे दोन संघ तब्बल 20 वर्षांनी वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भिडणार आहेत. यापूर्वी 2003 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात हे दोन संघ आमने-सामने आले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने भारताला 125 धावांनी पराभूत केले होते.

दरम्यान, अंतिम सामन्यापूर्वी या दोन्ही संघांची आमने-सामने कशी आकडेवारी आहे, याचा आढावा घेऊ.

वनडे क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आत्तापर्यंत 150 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 57 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर 83 सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 10 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

त्याचबरोबर वर्ल्डकपमध्ये आत्तापर्यंत 13 वेळा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामने झाले आहेत. यातील 8 वेळा ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे, तर भारताने 5 वेळा विजय मिळवला आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकपमध्ये 1983, 1987, 2011, 2019 आणि 2023 (साखळी फेरी) या वर्षी विजय मिळवला आहे. हे दोन संघ 1983, 1987 आणि 2003 सालच्या वर्ल्डकपमध्ये दोनदा आमने-सामने होते.

यातील 1983 आणि 1987 मध्ये दोन्ही संघांना एक सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. 2003 साली मात्र दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. याव्यतिरिक्त 1992, 1996, 1999 या तीन वर्ल्डकपमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाने पराभव स्विकारला होता.

अहमदाबादमधील आकडेवारी

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे आधी मोटेरा स्टेडियम म्हणून ओळखण्यात येत होते. पण काही वर्षांपूर्वी या स्टेडियमचे पूर्णपणे नुतनीकरण करण्यात आले, तसेच त्याचे पुन्हा 2021 साली उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर या स्टेडियमला नरेंद्र मोदी स्टेडियम हे नाव देण्यात आले.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुतनीकरण झाल्यानंतर अहमदाबादमधील स्टेडियममध्ये वनडे सामना झालेला नाही. पण त्याआधी 3 सामने येथे या दोन संघात झाले होते. त्यातील 2 सामने भारताने आणि एक सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे.

त्याचबरोबर भारताने अहमदाबादमध्ये एकूण 19 वनडे सामने खेळले आहेत. यातील १५ सामने भारताने स्टेडियमचे नुतनीकरण होण्यापूर्वी खेळले आहेत, ज्यातील 7 सामन्यात भारताने विजय मिळवले आहेत.

तसेच नुतनीकरण झाल्यानंतर भारताने या स्टेडियममध्ये खेळलेले सर्व 4 सामने जिंकले आहेत. यात वर्ल्डकप 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्याचाही समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाने अहमदाबादमध्ये जुन्या स्टेडियममध्ये 5 सामने खेळले आहेत, ज्यातील ३ सामने जिंकले होते, तर एक सामना पराभूत झाला होता. तसेच नुतनीकरण झालेल्या स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपमधील इंग्लंडविरुद्धचा सामना या स्टेडियममध्ये खेळला होता, ज्यात त्यांनी विजय मिळवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT