Nicholas Pooran Dainik Gomantak
क्रीडा

World Cup Qualifiers 2023: पूरनची तोडफोड बॅटिंग! 63 चेंडूत शतक करत मोडला गेलचा विक्रम

Nicholas Pooran: पूरनने वर्ल्डकप 2023 क्वालिफायर सोमवारी 63 चेंडूत शतक ठोकले.

Pranali Kodre

Nicholas Pooran 63 ball century: झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकप 2023 क्वालिफायर स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाकडून निकोलस पूरन दमदार फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने नुकतेच सोमवारी नेदरलँड्सविरुद्ध तुफानी शतकी खेळी करताना मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या पूरनने 63 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. त्याने 65 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 104 धावा केल्या.

त्यामुळे तो वेस्ट इंडिजकडून वनडेत सर्वात जलद शतक ठोकणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्याने ख्रिस गेलचा विक्रम मागे टाकला आहे. याआधी वेस्ट इंडिजकडून सर्वात जलद वनडे शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर गेलचे नाव होते, पण आता तिसरा क्रमांक पूरनने मिळवला आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर ब्रायन लारा असून त्याने 1999 मध्ये बांगलादेशविरुद्ध 45 चेंडूत शतक ठोकले होते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर गेल असून त्याने इंग्लंडविरुद्ध 2019 मध्ये 55 चेंडूत शतक ठोकलेले. गेल आता चौथ्या क्रमांकावरही असून त्याने 2003 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध 69 चेंडूत शतक केले होते.

वेस्ट इंडिजकडून सर्वात जलद वनडे शतक करणारे खेळाडू

45 चेंडू - ब्रायन लारा (विरुद्ध बांगलादेश, 1999)

55 चेंडू - ख्रिस गेल (विरुद्ध इंग्लंड, 2019)

63 चेंडू - निकोलस पूरन (विरुद्ध नेदरलँड्स, 2023)

69 चेंडू - ख्रिस गेल (विरुद्ध झिम्बाब्वे, 2003)

वेस्ट इंडिजने उभारला धावांचा डोंगर

दरम्यान, वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 374 धावा केल्या. यामध्ये पूरनव्यतिरिक्त ब्रेंडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स या सलामीवीरांनी अर्धशतके केली. त्यांनी सलामीला 101 धावांची शतकी भागीदारीही केली.

ब्रेंडन किंगने 81 चेंडूत 76 धावांची खेळी केली, तर चार्ल्सने 55 चेंडूत 54 धावांची खेळी केली. याशिवाय शाय होपने 38 चेंडूत 47 धावा केल्या, तर किमो पॉलने 25 चेंडूत 46 धावांची खेळी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजने धावांचा मोठा डोंगर उभारला.

नेदरलँड्सकडून बास दे लीड आणि साकिब झुलफिकर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तसेच लोगन वॅन बिक आणि विवियन किंगमा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT