Logan van Beek Dainik Gomantak
क्रीडा

World Cup Qualifiers 2023: सुपर ओव्हरमध्ये बॅटिंग अन् बॉलिंगमध्येही नेदरलँड्सच्या वॅन बिकचाच जलवा! वर्ल्ड रेकॉर्डही नावावर

World Cup Qualifiers 2023: सोमवारी नेदरलँड्सने वेस्ट इंडिजला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलेल्या सामन्यात लोगन वॅन बिकने बॉलिंग अन् बॅटिंगमध्येही कमाल करत इतिहास रचला

Pranali Kodre

ICC Cricket World Cup Qualifiers 2023, Netherlands vs West Indies, Logan van Beek Record:

झिम्बाब्वेमध्ये सुरु असेलल्या वर्ल्डकप 2023 क्वालिफायर सामन्यात सोमवारी नेदरलँड्स विरुद्ध वेस्ट इंडिज संघात थरारक सामना पाहायला मिळाला. हरारेला झालेल्या या सामन्यात नेदरलँड्सने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. लोगन वॅन बिक नेदरलँड्सच्या विजयाचा नायक ठरला.

या सामन्यात वेस्ट इंडिजने निकोलस पूरनने केलेल्या 65 चेंडूतील नाबाद 104 धावांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 374 धावा केल्या होत्या. पण 375 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सनेही 50 षटकात 9 बाद 374 धावा केल्या.

अखेरच्या चेंडूवर नेदरलँड्सला एका धावेची गरज असताना अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर जेसन होल्डने 28 धावांवर खेळणाऱ्या वॅन बिकचा झेल घेतला. त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता.

सुपर ओव्हमध्ये 30 धावांचा थरार

दरम्यान, सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेदरलँड्सकडून लोगन वॅन बिक आणि कर्णधार स्कॉट एडवर्ड्स फलंदाजीला उतरले, तर वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने गोलंदाजी केली. या संपूर्ण सुपर ओव्हरमधील 6 चेंडू वॅन बिकने खेळून काढले. त्याने या ६ चेंडूत तब्बल 30 धावा चोपल्या.

त्याने पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तर तिसऱ्या चेंडूवर पुन्हा चौकार ठोकला. त्यानंतर त्याने सलग दोन षटकार मारले, तर अखेरच्या चेंडूवर चौकार मारत नेदरलँड्सला 30 धावांचा टप्पा गाठून दिला.

त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये 30 धावा काढण्याच ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी टी20 किंवा वनडेमध्ये सुपर ओव्हरमध्ये 25 धावांपेक्षा अधिक धावा निघाल्या नव्हत्या.

त्यानंतर 31 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी वेस्ट इंडिजकडून जॉन्सन चार्ल्स आणि शाय होप फलंदाजीला उतरले, तर नेदरलँड्सकडून गोलंदाजी करण्यासाठीही वॅन बिकनेच चेंडू हातात घेतला.

त्याने पहिल्या तीन चेंडून एका षटकारासह 8 धावा दिल्या. पण चौथ्या चेंडूवर त्याने चार्ल्सला आणि पाचव्या चेंडूवर जेसन होल्डरला बाद केले. त्यामुळे वेस्ट इंडिजने दोन विकेट्स गमावल्याने सामना तिथेच संपला आणि नेदरलँड्सने थरारक विजय मिळवला.

वॅन बिकचा विक्रम

दरम्यान, वॅन बिकने सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक 30 धावा तर केल्याच, पण गोलंदाजी करताना 2 विकेट्सही घेतल्या. त्यामुळे तो असा पहिलाच खेळाडू ठरला आहे, ज्याने सुपर ओव्हरमधील सर्व 6 चेंडूवर फलंदाजीही केली आणि गोलंदाजी करताना दोन विकेट्सही घेतल्या.

वॅन बिकला त्याच्या या सामन्यातील अष्टपैलू खेळासाठी सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: चोरला घाटात पहाटे टेम्पोला भीषण आग; 5 लाखांचे नुकसान, वाळपई अग्निशमन दलाची धाव

Goa Politics: बनावट मतदारयादीचा मडगावात प्रयत्न! कॉंग्रेस नेते आक्रमक; BLA, BLOना निलंबित करण्याची मागणी

Chimbel: 'चिंबल प्रकल्प रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन'! युरी आलेमाव यांचा इशारा; नागरिकांना दिला पाठिंबा

Goa Theft: दरवाजा तोडून चोरटे घुसले, पुण्यातील पर्यटकाचा 1.85 लाखांचा ऐवज पळवला; लॅपटॉप, टॅब्लेट, मोबाईलही लंपास

Goa Politics: "भाजप सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे"! LOP युरींचा हल्लाबोल; विरोधी आमदारांची घेणार बैठक

SCROLL FOR NEXT