Team india Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: चाहत्यांसाठी मोठी बातमी, सेमीफायनल अन् Final मॅचसाठी ICC ने घेतला हा निर्णय

T20 World Cup New Rule for Semifinal and Final: ICC T20 विश्वचषक अतिशय शानदार पद्धतीने खेळवला जात आहे.

दैनिक गोमन्तक

T20 World Cup New Rule for Semifinal and Final: ICC T20 विश्वचषक अतिशय शानदार पद्धतीने खेळवला जात आहे. सध्याच्या टी-20 विश्वचषकाच्या बाद फेरीसाठी आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने उपांत्य आणि अंतिम सामन्यांच्या अटी जाहीर केल्या आहेत. या अटी ग्रुप स्टेजच्या सामन्यांपेक्षा वेगळ्या आहेत. पाऊस पडल्यास काय होईल, अशा प्रश्नांची उत्तरे समोर आली आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया...

आयसीसीने राखीव दिवस ठेवला

ग्रुप स्टेजमध्ये पावसामुळे सामना वाहून गेल्याने अनेक संघांना मनस्ताप सहन करावा लागला होता, मात्र आता उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पाऊस पडल्यास, ज्या स्थितीत सामना होणार, तेथून दुसऱ्या दिवशीची सुरुवात होईल. म्हणजेच हा सामना नव्याने खेळवला जाणार नाही. दोन्ही संघांमध्ये 10-10 षटकांचा खेळ झाल्यास तो डकवर्थ-लुईस नियमानुसार ठरवला जाईल.

सामन्यात पाऊस पडतो

उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसामुळे चेंडू टाकला गेला नाही तर, त्यांच्या गटात अव्वल असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल आणि ग्रुप स्टेजमध्ये सर्वाधिक विजय मिळविणाऱ्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश दिला जाईल. त्याचवेळी अंतिम सामन्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि सामना होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेता घोषित केले जाईल.

बरोबरीनंतर सुपर ओव्हर होईल

उपांत्य आणि अंतिम सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर होईल. जर सुपर ओव्हर देखील टायमध्ये संपली तर आणखी एक सुपर होईल. तोपर्यंत हे चालेल. निकाल येईपर्यंत. आयसीसीने 2019 च्या विश्वचषकानंतर हा नियम केला आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर अधिक चौकार मोजून सामन्याचा निकाल लागला.

किमान 10 षटके खेळली असावीत

उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात 10-10 षटकांचा खेळ नक्कीच असेल. काही कारणास्तव सामना उशीरा सुरु झाला तरी प्रत्येक डावात 10-10 षटके नक्कीच खेळली जातील. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT