Deepti Sharma | India Women Team Dainik Gomantak
क्रीडा

ICC च्या सर्वोत्तम 2023 महिला T20I संघ जाहीर! ऑस्ट्रेलियाच्या चार, तर भारताच्या एकमेव खेळाडूला संधी

ICC T20I Women Team 2023: आयसीसीसने 2023 मधील सर्वोत्तम महिला टी20 संघ जाहीर केला असून यात एकाच भारतीय खेळाडूला स्थान देण्यात आले आहे.

Pranali Kodre

ICC announced Women T20I Team of the Year 2023:

सोमवारी (22 जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2023 वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 11 महिला खेळाडूंची निवड केली आहे. या 11 खेळाडूंना 2023 च्या सर्वोत्तम महिला टी20 संघात स्थान दिले आहे.

आयसीसीच्या या महिला टी20 संघात अष्टपैलू दिप्ती शर्मा या एकाच भारतीय खेळाडूला संधी मिळाली आहे. दिप्तीने 2023 वर्षात भारतासाठी शानदार कामगिरी केली आहे. तिने 19 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 21 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 106 धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर आयसीसीने या महिला टी20 संघाचे कर्णधारपद श्रीलंकेच्या चामरी अटापट्टूकडे सोपवले आहे. अटापट्टूने या वर्षात 470 धावा केल्या आहेत.

दरम्यान, या संघात ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी, एलिस पेरी, ऍश्ले गार्डनर, मेगन शट या चार खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ड, इंग्लंडच्या नतालिया सायव्हर-ब्रंट आणि सोफी एक्लेस्टॉन, वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूज आणि न्यूझीलंडच्या एमेलिया केर यांना संधी दिली आहे.

सलामीसाठी आयसीसीने अटापट्टू आणि मुनीची निवड केली आहे. तसेच मधल्या फळीत वॉल्वाड, मॅथ्यूज, नतालिया यांना संधी दिली आहे.

अष्टपैलू म्हणून एमेलिया केर, एलिस पेरी, ऍश्ले गार्डनर आणि दिप्ती शर्मा यांची निवड झाली आहे. याशिवाय या चारही खेळाडू गोलंदाजीतही महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. गोलंदाजी फळीत मेगन शट आणि सोफी एक्लेस्टोन यांची निवड झाली आहे.

आयसीसी सर्वोत्तम टी20 संघ (महिला):

चामरी अटापट्टू (कर्णधार) (श्रीलंका), बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया), लॉरा वॉल्वार्ड (दक्षिण आफ्रिका), हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडिज), नतालिया सायव्हर-ब्रंट (इंग्लंड), एमेलिया केर (न्यूझीलंड), एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया), ऍश्ले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), दिप्ती शर्मा (भारत), सोफी एक्लेस्टॉन (इंग्लंड), मेगन शट (ऑस्ट्रेलिया).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT