Team India Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 साठी भारत 'या' दोन संघाविरुद्ध करणार अंतिम तयारी, पाहा सराव सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

World Cup 2023 Warm-up Matches Schedule: भारतात खेळवण्यात येणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे.

Pranali Kodre

ODI World Cup 2023 Warm-up Matches Schedule:

भारतात 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळला जाणार आहे. या क्रिकेटच्या कुंभमेळ्यात 10 संघ खेळणार आहेत. हे सर्व 10 संघ मुख्य स्पर्धेपूर्वी सराव सामने खेळणार आहे. या सराव सामन्यांचे वेळापत्रक ऑगस्टमध्येच आयसीसीने या जाहीर केले आहे.

29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान 10 सराव सामने खेळले जाणार आहेत. हे सराव सामने गुवाहाटी, हैदराबाद आणि तिरुअनंतपुरम येथे खेळवले जाणार आहेत. सर्व सराव सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. या सराव सामन्यांच्या तिकीट विक्रीही यापूर्वीच पूर्ण झाली आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की प्रत्येक संघ दोन सराव सामने खेळणार असून हे सराव सामने 50-50 षटकांचे होणार आहेत. पण त्यांना वनडे सामन्याचा दर्जा नसेल, कारण संघातील सर्व 15 खेळाडूंना मैदानात उतरण्याची संधी असणार आहे.

भारताचे सराव सामने इंग्लंड आणि नेदरलँड्स या दोन संघाविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंडविरुद्ध गुवाहाटीला 30 स्पटेंबर रोजी सराव सामना होईल, तर नेदरलँड्सविरुद्ध 3 ऑक्टोबर रोजी तिरुअनंतपुरमला सामना होईल.

असे आहे सराव सामन्यांचे वेळापत्रक

  • 29 सप्टेंबर -

  1. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका- बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी

  2. दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान - ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुअनंतपुरम

  3. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद

  • 30 सप्टेंबर

  1. भारत विरुद्ध इंग्लंड - बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी

  2. ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स - ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुअनंतपुरम

  • 2 ऑक्टोबर

  1. इंग्लंड विरुद्ध बांगलादेश - बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी

  2. न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुअनंतपुरम

  • 3 ऑक्टोबर

  1. अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका - बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी

  2. भारत विरुद्ध नेदरलँड्स - ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुअनंतपुरम

  3. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया - राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद

दहा संघात होणार सामने

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत यजमान भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्स हे संघ खेळणार आहेत.

या वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीमध्ये सर्व सहभागी 10 संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे.

त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि कोलकाता येथे होणाऱ्या उपांत्य सामन्यांमध्ये विजय मिळवणारे संघ 19 नोव्हेंबरला अंतिम सामन्यात खेळतील.

वर्ल्डकप 2023 मधील सामने हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरांमध्ये होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "मैदानात षटकार, स्टँड्समध्ये हाहाकार!" प्रियांश आर्याच्या शॉटनं चाहता जखमी; रक्तानं माखलेला व्हिडिओ व्हायरल

सत्तरीतील बंधारे बनले मद्यपींचे अड्डे! नदीपात्रात बाटल्यांचा खच आणि हुल्लडबाजी; उस्ते गावात मद्यपींचा धिंगाणा

Goa University : ‘बीए-एलएलबी एन्‍ट्रन्‍स’ निकालात पुन्‍हा घोळ; पालक साशंक, विद्यापीठाने बदलली 9 विद्यार्थ्यांची मेरीट लिस्‍ट

Israel Lebanon Conflict: "गाझासारखचं लेबनॉनही उद्ध्वस्त करणार!" इस्रायली संरक्षण मंत्र्यांची गर्जना; हिजबुल्लाचा 10 वर्षांचा प्लॅन धुळीला VIDEO

Goa Land Grab Case : जमीन घोटाळ्यातील मास्टरमाईंड रोहन हरमलकरला दणका! हायकोर्टाने फेटाळला जामीन; 212 कोटींची मालमत्ता जप्त

SCROLL FOR NEXT