I-League: Shoib Akhtar Dainik Gomantak
क्रीडा

I-League: सेझा अकादमीच्या शोईबशी गोकुळम केरळाचा करार

I-League: 2018-19 मोसमात गोवा प्रो-लीग, तसेच एलिट लीग फुटबॉल स्पर्धेत प्रतिनिधित्व

किशोर पेटकर

पणजीः गोव्यातील (Goa) सेझा फुटबॉल अकादमीत (Sesa Football Academy) प्रशिक्षित झालेल्या शोईब अख्तर (Shoib Akhtar) याला आगामी आय-लीग (I-League) फुटबॉल स्पर्धेसाठी गोकुळम केरळा एफसीने (Gokulam Kerala FC) करारबद्ध केले आहे. 2017-2020 या कालावधीत तो सेझा अकादमीच्या अखिल भारतीय पातळीवरील पहिल्या तुकडीत होता.

मूळ मणिपूरच्या (Manipur) शोईबने 2018-19 मोसमात सेझा फुटबॉल अकादमीचे गोवा प्रो-लीग, तसेच एलिट लीग फुटबॉल स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते. 2020-21 मोसमात तो नेरोका एफसीतर्फे आय-लीग फुटबॉल स्पर्धेत 10 सामने खेळला होता. गोकुळम केरळा एफसीने करारबद्ध केल्याबद्दल वेदांता स्पोर्टसचे अध्यक्ष अनन्य अगरवाल यांनी शोईबचे अभिनंदन केले आहे. देशभरातील क्रीडा विकासासाठी वेदांता स्पोर्टस कटिबद्ध आहे. सेझा फुटबॉल अकादमीच्या माजी प्रशिक्षणार्थीच्या यशाचे साक्षीदार होणे आनंददायी असल्याचे अगरवाल यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT