football
football Dainik Gomantak
क्रीडा

I-League 3: धेंपो क्लबची अपेक्षित सुरवात; केरळा युनायटेडला एका गोलने नमविले

किशोर पेटकर

I-League 3: धेंपो स्पोर्टस क्लबने रविवारी तृतीय श्रेणी आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीतील मोहिमेस अपेक्षित विजयी सुरवात केली. त्यांनी केरळा युनायटेडला १-० फरकाने हरविले. वास्को येथील टिळक मैदानावर लढत झाली.

सामन्याच्या ७८व्या मिनिटास बदली खेळाडू शुभम रावत याने केलेल्या गोलमुळे धेंपो क्लबला पूर्ण तीन गुणांची कमाई करता आली. केरळा युनायटेडचा हा दोन लढतीतील पहिला पराभव ठरला. त्यामुळे त्यांचे तीन गुण कायम राहिले.

केरळा युनायटेडला सामन्यात नऊ खेळाडूंसह, तर धेंपो क्लबला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. केरळा युनायटेडच्या रुद्रराजसिंग जडेजा याला २३व्या, तर विल्यम लालनुनफेला याला २४व्या मिनिटास रेड कार्ड दाखविण्यात आले. धेंपो क्लबच्या सेईगौमांग डौंगेल याला २४व्या मिनिटास रेड कार्ड मिळाले.

प्ले-ऑफ फेरीतील आणखी एका सामन्यात स्पोर्टिंग क्लब बंगळूरने मणिपूरच्या क्लासा (केईनौ लायब्रेरी अँड स्पोर्टस असोसिएशन) एफसी संघाला ३-२ असे निसटते हरविले. बंगळूरच्या संघाचा हा दोन लढतीतील पहिला विजय असून क्लासा संघाला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला.

स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीत मंगळवारी (ता. २६) क्लासा एफसी व स्पोर्टिंग क्लब द गोवा यांच्यात, तसेच धेंपो स्पोर्टस क्लब व स्पोर्टिंग क्लब बंगळूर यांच्यात लढत होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Goa: म्हापशात 510 किलो पनीरसह कांदा जप्त; एफडीएकडून दुसऱ्यांदा कारवाई

Goa Crime: कौटुंबिक वादातून महिलेने उचललं मोठ पाऊल; पोटच्या मुलांना फिनाईल पाजत केला आत्महत्येचा प्रयत्न

Mormugao Sada: सडा परिसरात लवकरच उभे राहणार प्राथमिक आरोग्य केंद्र; मुख्यमंत्री सावंत

FC Goa: नुवेच्या रॉलिन बोर्जिस याच्याशी एफसी गोवाचा कायमस्वरुपी करार, अनुभवाचा होणार फायदा

Goa Today's Live News: आठव्या अधिवेशनासाठी विरोधकांची रणनीतीवर चर्चा

SCROLL FOR NEXT