HS Prannoy  Dainik Gomantak
क्रीडा

Malaysia Masters 500 Trophy 2023: एचएस प्रणॉयने रचला इतिहास, 'हा' किताब जिंकणारा ठरला पहिला भारतीय पुरुष खेळाडू!

Malaysia Masters 500 Trophy: भारतासाठी पुरुष एकेरीत हे विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

Manish Jadhav

H.S Prannoy Wins Malaysia Masters 500 Trophy 2023: भारताचा स्टार शटलर एचएस प्रणॉयने मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत चीनच्या वांग हाँग यांगचा 21-19, 13-21, 21-18 असा तीन गेमच्या चुरशीच्या लढतीत पराभव करुन आपले पहिले BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावले आहे. भारतासाठी (India) पुरुष एकेरीत हे विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

एचएस प्रणॉयने इतिहास रचला

दरम्यान, या विजयासह एचएस प्रणॉयने सहा वर्षांहून अधिक काळातील पहिले पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले. हा त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा आहे. यापूर्वी, त्याने 2017 यूएस ओपनमध्ये विजेतेपद जिंकले होते, जे BWF ग्रँड प्रिक्सचा एक भाग होता, जो सध्याच्या BWF वर्ल्ड टूरचा पूर्ववर्ती होता.

दुसरीकडे, प्रणॉय आणि यांग हे वर्षातील आपला पहिला अंतिम सामना खेळताना पहिल्या गेमच्या सुरुवातीलाच आमनेसामने आले. जसजसा खेळ पुढे सरकत गेला तसतसे दोन्ही खेळाडूंनी आघाडी मिळवण्यासाठी झुंज दिली. 16-16 अशी स्कोअरची बरोबरी असताना, प्रणॉयने आक्रमकता धारण केली आणि सामन्यातील पहिला गेम जिंकला.

जबरदस्त सामना झाला

प्रणॉय (HS Prannoy) सामन्याच्या दुसऱ्या गेममध्ये लय राखण्यात अपयशी ठरला आणि मध्यंतरापर्यंत चीनच्या खेळाडूने 11-9 अशी आघाडी घेतली. नंतर, त्याने सलग सहा गुण जिंकले. अशारितीने दुसरा गेम जिंकून सामना निर्णायक ठरला.

शेवटच्या गेममध्ये, प्रणॉयने संथ सुरुवात केली. सुरुवातीला 2-5 ने तो पिछाडीवर पडला, परंतु 9-9 अशी बरोबरी साधत त्याने जोरदार पुनरागमन केले. 18-ऑल असताना, प्रणॉयने तीन बॅक-टू-बॅक गुणांसह सामना संपवला आणि BWF सुपर 500 स्पर्धा जिंकली.

प्रणॉयने दमदार प्रदर्शन केले

इंडोनेशियाच्या (Indonesia) ख्रिश्चन एडिनाटाने उपांत्य फेरीदरम्यान दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर प्रणॉय (HS Prannoy) अंतिम फेरी पोहोचला होता. याआधी, 30 वर्षीय प्रणॉयने जपानच्या केंटा निशिमोटो आणि गतविजेत्या ऑल इंग्लंड चॅम्पियन ली शी फेंगचा अनुक्रमे उपांत्यपूर्व आणि उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT