Goa Women Cricket Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याच्या महिला संघाला तीन धावांनी नमवून हिमाचल उपांत्यपूर्व फेरीत

शिखा, तेजस्विनीचे झुंजार प्रयत्न तोकडे

दैनिक गोमन्तक

पणजी : कर्णधार शिखा पांडे व तेजस्विनी दुर्गड यांनी मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना झुंजार शतकी भागीदारी केली, पण अखेरीस त्यांचे प्रयत्न तोकडेच ठरले. हिमाचल प्रदेशने गोव्यावर तीन धावांनी निसटती मात करून सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेतील उपउपांत्यपूर्व सामना गुरुवारी सूरत येथील सी. के. पिठवाला मैदानावर  झाला. गोव्यासमोर विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य होते. पहिल्या तिघी 4.3 षटकांत 24 धावांत माघारी परतल्यानंतर शिखाने तेजस्विनीच्या साथीत सामना खेचून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. दोघींनी चौथ्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली, मात्र हिमाचलच्या हरलीन देओल हिने जम बसलेल्या दोघींनाही नऊ चेंडूंच्या फरकाने बाद केल्यामुळे गोव्याला विजय थोडक्यात हुकला.

शिखाचे अर्धशतक

शिखाने 50 चेंडूंत नऊ चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या, तर तेजस्विनीने 31 चेंडूंत तीन चौकार व एका षटकाराच्या मदतीने 40 धावा केल्या. त्यांनी 76 चेंडूंत 110 धावांची भागीदारी केली. 17 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर तेजस्विनी बाद झाली. नंतर गोव्याला विजयासाठी 10 चेंडूंत 17 धावा हव्या असताना शिखा झेलबाद झाली आणि सामना गोव्याच्या हातून निसटला. शेवटच्या षटकात 12 धावा करण्याचे आव्हान गोव्याच्या तळाच्या फलंदाजांना जमले नाही. गोव्याचा डाव 7 बाद 164 धावांवर रोखला गेला.

हरलीनची फटकेबाजी

त्यापूर्वी, हरलीन देओल हिने फटकेबाजी केल्यामुळे हिमाचल प्रदेशला प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 167 धावा करता आल्या. हरलीनने 66 चेंडूंत 10 चौकार व दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 84 धावा केल्या. तिने निकिता चौहान (43) हिच्यासमेवत हिमाचलला 90 धावांची सलामी दिली, नंतर एस. एम. सिंग हिच्यासह दुसऱ्या विकेटसाठी 44 धावांची, तर कर्णधार सुषमा वर्मा हिच्यासह तिसऱ्या विकेटसाठी 12 चेंडूंत 33 धावांची अभेद्य भागीदारी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT