Syed Mushtaq Ali Trophy 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Senior Womens T-20 Tournament: हिमाचल प्रदेशने गोव्याच्या महिलांना 26 धावांनी नमविले

Senior Womens T-20 Cricket Tournament: नागपूर येथील लेडी अमृताबाई डागा महाविद्यालय मैदानावर झाला

किशोर पेटकर

Senior Women's T20 Trophy 2023-24: सीनियर महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याला गुरुवारी ड गटात अपेक्षित सुरवात करता आली नाही. हिमाचल प्रदेशने त्यांना २६ धावांनी हरविले. सामना नागपूर येथील लेडी अमृताबाई डागा महाविद्यालय मैदानावर झाला.

हिमाचल प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १४४ धावा केल्या. कर्णधार हरलीन देवल (४८) व निकिता चौहान (४१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या ७३ धावांच्या भागीदारीमुळे त्यांना सावरता आले. उत्तरादाखल गोव्याला ९ बाद ११८ धावांची मजल मारता आली. गोव्याच्या तिघीजणी धावबाद झाल्या.

संक्षिप्त धावफलक:

हिमाचल प्रदेश ः २० षटकांत ५ बाद १४४ (निकिता चौहान ४१, हरलीन देवल ४८, सोनल ठाकूर नाबाद २५, शिखा पांडे ४-०-२५-१, निकिता मळीक २-०-८-०, प्रियांका कौशल ३-०-२०-०, पूर्वा भाईडकर ३-०-२४-०, तरन्नुम पठाण १-०-१८-०, सुनंदा येत्रेकर ३-०-१८-०, तनया नाईक ४-०-३१-३) वि

वि. गोवा: २० षटकांत ९ बाद ११८ (पूर्वजा वेर्लेकर १९, तरन्नुम पठाण ३१, संजुला नाईक २४, शिखा पांडे ५, तेजस्विनी दुर्गड २, सुनंदा येत्रेकर ५, विनवी गुरव १७, पूर्वा भाईडकर ५, निकिता मळीक ५, तनया नाईक नाबाद ०, प्रियांका कौशल नाबाद ०, सुश्मिता कुमारी २-२६).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT