Cricket Coach Dainik gomantak
क्रीडा

Hemant Angle: मडगावचे आंगले आसामच्या क्रिकेट संघाला करणार 'ट्रेन'

दुसऱ्या राज्यातर्फे नियुक्ती झालेले पहिले गोमंतकीय क्रिकेट मार्गदर्शक

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याचे माजी रणजी क्रिकेट संघ उपकर्णधार, आयसीसी लेव्हल 2 क्रिकेट प्रशिक्षक मडगाव येथील हेमंत पै आंगले यांची आसाम क्रिकेट असोसिएशनने आगामी 16 वर्षांखालील विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

(Hemant Angle of Goa has been selected as the coach of the Assam cricket team)

देशातील दुसऱ्या राज्याच्या क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त होणारे हेमंत हे पहिले गोमंतकीय ठरले आहेत. आसामच्या 16 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघाचे शिबिर एक नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे होईल, असी माहिती हेमंत यांनी दिली.

आसामच्या 16 वर्षांखालील क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी घेतलेल्या मुलाखतीद्वारे 64 वर्षीय हेमंत यांची निवड झाली. आसामची विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेतील मोहीम एक डिसेंबरपासून सुरू होईल. त्यांच्या गटात सिक्कीम, त्रिपुरा, मध्य प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र हे संघ असून सामने गुजरातमधील सूरत येथे खेळले जातील.

सलग 33 रणजी सामने

हेमंत आंगले गोव्यातर्फे 1985-86 ते 1991-92 या कालावधीत सलग 33 रणजी क्रिकेट सामने खेळले. दोन वेळ डावात पाच गडी बाद करताना त्यांनी फिरकी गोलंदाजीने 58 गडी बाद केले, अष्टपैलू चमक दाखविताना चार अर्धशतकांसह 1085 धावा नोंदविल्या.

त्यांनी गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाचे उपकर्णधारपदही भूषविले. एनसीए लेव्हल 1, आयसीसी लेव्हल 2 प्रशिक्षक असलेल्या हेमंत यांनी गोव्याच्या सीनियर क्रिकेट संघ निवड समितीचे अध्यक्षपद, तसेच ज्युनियर निवड समितीचे सदस्यपद भूषविले आहे.

हेमंत हे दोन वेळा गोवा क्रिकेट असोसिएशनच्या व्यवस्थापकीय समितीचेही सदस्य होते. बीसीसीआय क्रिकेट सामनाधिकारी, पंच म्हणूनही त्यांनी काम केले आहे. एम. एस. धोनी क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने ते चार वर्षे कार्यरत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘लर्न टू प्ले क्रिकेट वुईथ हेमंत आंगले’ या पुस्तकाचे प्रतिष्ठित मेरीलेबॉन क्रिकेट क्लबने (एमसीसी) कौतुक केले आहे. नोव्हेंबरमध्ये ते आयसीसी लेव्हल 3 प्रशिक्षक अभ्यासक्रमात सहभागी होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

Rohit Sharma Record: मास्टर-ब्लास्टरचा मोडला मोठा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज; वनडे क्रमवारीत 'हिटमॅन'चे राज्य

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'फर्स्ट क्लास' ऑरा; 'जेलर 2' च्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल Watch Video

SCROLL FOR NEXT