Cricket 
क्रीडा

Vijay Merchant Trophy: गोव्याच्या मुलांवर डावाने पराभवाची नामुष्की, हरियाणा गटात अव्वल

Goa vs Haryana U16 : गोव्याविरुद्धच्या विजयानंतर हरियाणाने गटात अव्वल क्रमांक मिळवला आहे.

किशोर पेटकर

Vijay Merchant Trophy, Goa vs Haryana U16:

गोव्याचे फलंदाजीतील अपयश कायम राहिल्यामुळे विजय मर्चंट करंडक 16 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत रविवारी (17 डिसेंबर) सलग दुसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले.

हरियाणाने डाव व 148 धावांनी दणदणीत विजय नोंदवत ‘ब’ गटात अव्वल स्थानही मिळविले. तीन दिवसीय सामना दुसऱ्याच दिवशी संपला.

सुरत येथील सी. के. पिठावाला स्टेडियमवर झालेल्या या लढतीत हरियाणाने 5 बाद 368 धावांवर डाव घोषित करून 284 धावांची आघाडी प्राप्त केली होती. पहिल्या डावात 84 धावांत गारद झालेल्या गोव्याचा दुसरा डाव 136 धावांत संपला.

हरियाणाला या लढतीत बोनस गुणही मिळाला. त्यांचा हा दुसरा विजय असून चार लढतीनंतर 20 गुण झाले आहेत. दुसऱ्या पराभवामुळे गोव्याचे चार लढतीनंतर सात गुण कायम राहिले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: 84

हरियाणा, पहिला डाव (2 बाद 209 वरून): 96 षटकांत 5 बाद 368 घोषित (लक्षय नागर 91, करण शोरन 47, प्रिक्षित राठी नाबाद 61, समर्थ राणे 17-3-60-1, शमिक कामत 13-1-49-0, संचित नाईक 22-0-99-1, द्विज पालयेकर 22-0-80-1, जय कांगुरी 14-4-39-1, आराध्य गोयल 6-0-29-1, चिगुरुपती व्यंकट 2-0-9-0).

गोवा, दुसरा डाव : 51 षटकांत सर्वबाद 136 (आशुतोष तेंबकर 0, स्वप्नेश नाईक 0, द्विज पालयेकर 31, आराध्य गोयल 48, प्रद्युम्न अटपडकर 21, चिगुरुपती व्यंकट 5, साई नाईक 29, शमिक कामत 1, समर्थ राणे नाबाद 0, जय कांगुरी 0, संचित नाईक 0, तन्मय बलोडा 44-3, करण शोरन 3-3).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT