Hardik Pandya Son | Krunal Pandya Dainik Gomantak
क्रीडा

Hardik Pandya Son: ज्यूनियर पंड्याकडून कृणाल क्लीन बोल्ड, अगस्त्य टाकतोय बाबा-काकाच्या पावलावर पाऊल, Video

हार्दिकचा मुलगा कृणाल पंड्याला क्लीन बोल्ड करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Hardik Pandya Son: भारतीय संघात हार्दिक पंड्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. त्याने फलंदाजीतच नाही, तर गोलंदाजीतही भरीव योगदान दिले आहे. तसेच त्याचा मोठा कृणाल देखील भारताकडून खेळला आहे. अशातच आता हार्दिकचा मुलगा अगस्त्य देखील त्याच्या बाबांच्या आणि काकांच्या पावलावर पाऊल टाकताना दिसत आहे.

नुकताच कृणालने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये अगस्त्य गोलंदाजी करताना दिसत आहे. 2 वर्षीय अगस्त्य गोलंदाजी करत असताना कृणाल फलंदाजी करत आहे. यावेळी अगस्त्यने फिरकी गोलंदाजी करत कृणालला क्लीन बोल्ड केले. अगस्त्यने टाकलेला चेंडू पाहून कृणालही चकीत झाला होता.

त्याने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की 'क्रिकेटचे जीन्स कुटुंबातच आहेत.' त्याच्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. अगस्त्यची आई आणि हार्दिकची पत्नी नताशानेही हर्टच्या इमोजी कमेंट केल्या आहेत. तसेच कृणालची पत्नी पंखुरीनेही कमेंट केली आहे.

कृणालने यापूर्वीही अनेकदा पुतण्या अगस्त्यबरोबर क्रिकेट खेळतानाचे किंवा त्याला सरावाला घेऊन जातानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

हार्दिक सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये

दरम्यान, सध्या हार्दिक पंड्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने टी२० क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्वही केले आहे. त्याने नुकताच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताचे नेतृत्व करताना मालिकावीराचा पुरस्कारही जिंकला.

त्याने या मालिकेत 5 विकेट्स घेतल्या, त्यामुळे या मालिकेत तो अर्शदीप सिंगसह सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या अव्वल स्थानी राहिला. तसेच त्याने तीन सामन्यांत फलंदाजी करताना 66 धावा केल्या. तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिला. 

त्याने या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शानदार अष्टपैलू कामगिरी करताना ४ विकेट्स घेतल्या होत्या, तसेच ३० धावांची खेळीही केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT