Hardik Pandya 
क्रीडा

Hardik Pandya: इमामला आऊट करण्याआधी बॉल तोंडाशी नेत काय पुटपुटला, स्वत: हार्दिकनेच केला खुलासा

India vs Pakistan: इमाम-उल-हकला बाद करण्यापूर्वी बॉल तोंडाजवळ नेऊन हार्दिक काहीतरी बोलताना दिसला होता, याबद्दल त्यानेच खुलासा केला आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Pakistan, Hardik Pandya opened up on his act before Imam-ul-Haq Wicket:

शनिवारी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत झालेल्या 12 व्या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. अहदमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना झाला. दरम्यान, भारताने हा सामना जिंकला असतानाच या सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या सोशल मीडियावर ट्रेंड होत होता.

हार्दिकच्या ट्रेंड होण्याचं कारण त्याने इमाम-उल-हकची विकेट घेण्याआधी केलेली कृती होती. आता याबद्दल हार्दिकने प्रतिक्रिया दिली आहे.

झालं असे की पाकिस्तानने पहिली विकेट 8 व्या षटकात अब्दुल्ला शफिकच्या रुपात गमावली होती. त्यानंतर इमाम आणि कर्णधार बाबर आझम त्यांचा डाव सावरत होते.

13 व्या षटकात हार्दिकविरुद्ध दुसऱ्या चेंडूवर इमामने चौकार ठोकला होता. मात्र त्यानंतरच्या चेंडूवर हार्दिकने इमामला चूक करण्यास भाग पाडले. इमाम फटका खेळताना चूकला आणि चेंडू त्याच्या बॅटची कड घेत मागे गेला. त्यावेळी यष्टीरक्षक केएल राहुलने त्याचा झेल घेतला.

मात्र, चर्चा झाली ती हार्दिकने ही विकेट घेण्याआधी केलेल्या कृतीची. हार्दिक 13 व्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यापूर्वी चेंडू हातात घेऊन तो तोंडाजवळ नेऊन काहीतरी पुटपुटल्याचे दिसले. त्याचा हा फोटो बराच व्हायरल झाला. त्याच्यावर विविध प्रतिक्रियाही आल्या.

दरम्यान, तो त्यावेळी नक्की काय म्हणत होता, याबद्दल त्याने सामना संपल्यावर ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात जतीन सप्रू, गौतम गंभीर आणि इरफान पठाण यांच्याशी बोलताना खुलासा केला.

हार्दिकने सांगितले की 'तेव्हा खरंतर मी स्वत:लाच शिव्या घालत होतो. चांगल्या लेंथवर चेंडू टाकण्यास आणि जास्त प्रयोग न करण्यास सांगत होतो.'

दरम्यान, या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ 42.5 षटकांमध्ये 191 धावांत सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. तसेच मोहम्मद रिझवानने 49 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 30.2 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 86 धावांची खेळी केली. तसेच श्रेयस अय्यरने नाबाद 53 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने 2 विकेट्स घेतल्या आणि हसन अलीने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT