Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

हार्दिक पांड्याला महागड्या वस्तूंचा लागलाय नाद ..!

करोडोंचे हिरेजडीत घड्याळ घालून मिरावतोय हार्दिक पांड्या; याचमुळे अला अडचणीत, जाणून घ्या त्याच्या घडळयाची किंमत..

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार (Indian cricket team) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याबाबत (Hardik Pandya) एक मोठी बातमी समोर आली आहे की, सीमा शुल्क विभागाने त्याची ५ कोटी रुपयांची दोन घड्याळे जप्त केली आहेत. या घड्याळांची किंमत ५ कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याने घड्याळांची घोषणा केली नव्हती तसेच हार्दिककडे या घड्याळांचे बिल देखील नव्हते आणि त्याने घड्याळे जाहीरही केली नाहीत. IPL 2021 सुरू होण्यापूर्वी पांड्याने त्याच्या घड्याळांचे काही फोटो शेअर केले होते.

हार्दिक पांड्या क्रिकेटसोबतच त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठी ओळखला जातो. महागड्या गाड्यांशिवाय पंड्याला महागड्या घड्याळांची खूप आवड आहे. हार्दिककडे अनेक उत्तम घड्याळांचा संग्रह आहे. IPL 2021 च्या आधी, हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या नवीन घड्याळाचा फोटो शेअर केला होता. दरम्यान हार्दिक पंड्याच्या या घड्याळांनी सोशल मीडियावरही बरीच हेडलाईन बनवली होती.

भारतीय संघाच्या या स्टार अष्टपैलू खेळाडूने Patek Philippe Nautilus Platinum 5711 घड्याळ विकत घेतले आहे. Patek Philippe Nautilus Platinum 5711

बद्दल काही खास गोष्टी

Patek Philippe Nautilus हे इतिहासातील सर्वात महत्त्वाचे आणि प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट घड्याळ म्हणून ओळखले जाते.

हाती आलेल्या माहितीनुसार, Patek Philippe Nautilus Platinum 5711 घड्याळ स्टेनलेस स्टील आणि विशेष प्रकारचा हिरा (32 Baguette-cut Diamonds) पासून बनवला आहे. यासोबतच त्यात ल्युमिनेसेंट लेप असलेले सोन्याचे तास मार्कर लावलेले आहेत. तुम्ही या घड्याळाबद्दल ऑनलाइन अधिक माहिती घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT