Hardik Pandya And Arshdeep Singh IPL Trade Deal Dainik Gomantak
क्रीडा

IPL Trade Deal: अखेर सस्पेन्स संपला! हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंहच्या ट्रेडवर BCCI चा शिक्कामोर्तब; सॅलरीत कोणताही बदल नाही

Hardik Pandya And Arshdeep Singh IPL Trade Deal: आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी ट्रेड डील अखेर पूर्ण झाली.

Manish Jadhav

Hardik Pandya And Arshdeep Singh IPL Trade Deal: आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी ट्रेड डील अखेर पूर्ण झाली असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह यांच्या ट्रेडला अधिकृत मंजुरी दिली. मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलेल्या या वृत्ताने क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगवली असून, दोन्ही फ्रँचायझींना या मंजुरीबाबतची औपचारिक माहिती देण्यात आली.

विशेष म्हणजे, या मेगा ट्रेड डीलमध्ये दोन्ही खेळाडूंच्या मानधनात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, म्हणजेच पंजाब किंग्समध्ये सामील होणाऱ्या हार्दिक पांड्याला त्याची आधीची 16.35 कोटी रुपयांची रक्कमच मिळणार आहे, तर मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या अर्शदीप सिंहलाही 18 कोटी रुपयांचीच सॅलरी कायम ठेवली गेली आहे.

गेल्या आठवडाभरापासून चर्चेत असलेल्या या डीलमध्ये अंतिम कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास खेळाडूंनी थोडा वेळ घेतल्यामुळे काहीसा उशीर झाला होता. मात्र, आपापल्या फ्रँचायझींसोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर अखेर दोन्ही खेळाडू या अदलाबदलीस मान्य झाले आणि फ्रँचायझींनी याबाबत बीसीसीआयकडे आपली सहमती दर्शवली. या संपूर्ण घडामोडीत आता सर्वात मोठा आणि रंजक प्रश्न हा उपस्थित होत आहे की, हार्दिक पांड्या पंजाब किंग्सचे कर्णधारपद भूषवणार की केवळ एक प्रमुख खेळाडू म्हणून मैदानात उतरणार.

सध्या पंजाब किंग्सचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे, जो भारताच्या टी-20 संघाचाही कर्णधार आहे. त्यामुळे अय्यरच्या उपस्थितीत हार्दिकला संघाचे नेतृत्व मिळणे तसे कठीण दिसत असून, तो एका खेळाडूच्या भूमिकेतच खेळण्याची दाट शक्यता आहे.

सध्या भारतीय संघातही हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालीच खेळावे लागत आहे, त्यामुळे आयपीएलमध्येही त्याला अय्यरच्या हाताखाली खेळताना कोणतीही अडचण येणार नाही, असे मानले जात आहे. बीसीसीआयच्या या मंजुरीनंतर आता कोणत्याही क्षणी या बहुचर्चित ट्रेड डीलची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. या अदलाबदलीमुळे आगामी आयपीएल हंगामातील समीकरणे पूर्णपणे बदलणार असून, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांची आगामी रणनीती कशी असेल, याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

4 वर्षीय चिमुरडीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! म्हापशातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद, 83 कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव दीड वर्षापासून खातोय धूळ

Weather Update: पहाटे हुडहुडी तर दुपारी उन्हाचा चटका! हिवाळा सुरू, पण उन्हाचा तडाखा कायम, राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ

कर्करोगाशी दोनदा झुंज देताना हादरले होते; सोनिया गांधी यांनी आत्मचरित्रातून उलगडला आजारपणाचा संघर्ष

Goa Ujjwala Scheme: मंत्र्यांचा दणका बसताच अधिकाऱ्यांची धावपळ; 'गोवा उज्ज्वला'च्या अर्जांची चार तालुक्यांत छाननी पूर्ण, बुधवारपासून लाभार्थ्यांना मिळणार पैसे!

VIDEO: आसगावात अग्नितांडव! चार कामगार होरपळले; एकाची प्रकृती चिंताजनक, गोमेकॉत उपचार सुरू

SCROLL FOR NEXT