Hardik Pandya and Natasa Stankovic Wedding Dainik Gomantak
क्रीडा

Hardik Pandya: अन् लग्नमंडपात वर-वधू बनलेल्या हार्दिक-नताशानं धरला ठेका, Video तुफान व्हायरल

हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांनी व्हॅलेंटाईन डे निमित्ताने पुन्हा एकदा लग्न केले असून त्यांच्या लग्नातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Hardik Pandya: भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने दोन दिवसांपूर्वीच नताशा स्टॅन्कोविकबरोबर दुसऱ्यांदा लग्न केले आहे. त्यांच्या या लग्नसोहळ्यामधील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये हार्दिक आणि नताशा डान्स करताना दिसत आहेत.

नताशा आणि हार्दिक यांनी यापूर्वी 2020 मध्ये लग्न केले होते. पण आता तीन वर्षांनी पुन्हा एकदा व्हॅलेंटाईन डे निमित्तानी त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले आहे. त्यांचा हा लग्नसोहळा उदयपूरमध्ये पार पडला. या सोहळ्यासाठी हार्दिक आणि नताशा यांचे नातेवाईक तसेच मित्रपरिवार उपस्थित होता.

या सोहळ्यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यातीलच एका व्हिडिओमध्ये दिसते की हार्दिक आणि नताशा हातात हात घालून चालत असताना अचानक एका गाण्यावर डान्स करायला लागतात. नताशाचा गाऊन धरणाऱ्या तिच्या ब्राईड्समेडही या व्हिडिओमध्ये ठेका धरताना दिसतात. तसेच हार्दिक स्पेशल डान्स मुव्हज करतानाही दिसतो. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

हार्दिक आणि नताशा यांनी त्यांच्या लग्नादरम्यानचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हार्दिक आणि नताशा काही रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या लग्नासाठी उपस्थित असलेले नातेवाईक आणि मित्रपरिवारही दिसत आहे. याबरोबरच हार्दिक आणि नताशा यांचा अडीचवर्षांचा मुलगा अगस्त्य देखील दिसत आहे.

हार्दिक आणि नताशा यांनी जानेवारी 2020 मध्ये साखरपूडा केला होता. त्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यांना 30 जुलै 2020 रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले होते. त्यानंतर आता त्यांनी तीन वर्षांनी पुन्हा लग्नगाठ बांधली. नताशा ही सर्बियन मॉडेल असून तिने काही बॉलिवूड चित्रपटात कामही केले आहे.

दरम्यान, हार्दिक भारतीय संघाच्या कसोटी संघातून दूर आहे, त्यामुळे तो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या कसोटी मालिकेचा भाग नाही. दरम्यान, तो आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्चमध्ये होणाऱ्या वनडे मालिकेत भारताकडून खेळताना दिसू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT