Kane Williamson
Kane Williamson Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 Video: सिक्स रोखण्याचा प्रयत्न विलियम्सनला महागला? पहिल्या विजयानंतरही गुजरातला मोठा धक्का

Pranali Kodre

Kane Williamson Injury: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील पहिला सामना शुक्रवारी गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात गुजरातने 5 विकेट्सने विजय मिळवला आणि स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. मात्र, या सामन्यादरम्यान गुजरातला तगडा झटका बसला आहे.

शुक्रवारी गुजरातकडून पहिला आयपीएल सामना खेळणारा केन विलियम्सन क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाला. सामन्याच्या १३ व्या षटकात सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने मारलेल्या मोठ्या फटक्यावर चेंडूला सीमापार जाण्यापासून रोखताना विलियम्सन जखमी झाला. चेंडू आडवताना तो त्याच्या उजव्या गुडघ्यावर पडल्याने त्याचा गुडघा दुखावला गेला आहे.

त्याच्यावर लगेचच मैदानावर उपचार करण्यात आले होते. पण त्याला नीट चालताही येत नसल्याने तो मेडिकल स्टाफच्या मदतीने मैदानातून बाहेर गेला. त्यानंतर तो मैदानात उतरला नाही. त्याच्या जागेवर फलंदाजीसाठी साई सुदर्शन इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरला होता.

दरम्यान, आता काही रिपोर्ट्स असे समोर येत आहेत की विलियम्सन या संपूर्ण आयपीएल हंगामातूनच बाहेर होण्याची दाट शक्यता आहे. त्याची गुडघ्याची दुखापत गंभीर आहे. पण अद्याप गुजरातकडून अधिकृतरित्या याबद्दल कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

विलियम्सन गुजरात संघातील महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये गणला जात होता. तसेच त्याचा अनुभव गुजरातसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकला असता. त्याचमुळे आता जर तो खरंच या संपूर्ण हंगामातून बाहेर झाला, तर गुजरातसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

केन विलियम्सनला आयपीएल 2023 पूर्वी सनरायझर्स हैदराबादने मुक्त केले होते. त्यामुळे त्याला लिलावातून गुजरात जायंट्सने 2 कोटी रुपयांच्या त्याच्या मुळ किमतीत खरेदी केले होते. त्यानंतर विलियम्सनला पहिल्याच सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र आता तो या हंगामातून बाहेर होण्याची वर्तवली जात आहे.

विलियम्सनने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 77 सामने खेळले असून 36.22 च्या सरासरीने 18 अर्धशतकांसह 2101 धावा केल्या आहेत. त्याने 2018 साली ऑरेंज कॅपही जिंकली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT