MS Dhoni
MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni on Last Match: पुन्हा चेन्नईत खेळणार का? धोनी म्हणतोय, 'CSK बरोबर असेल, पण...'

Pranali Kodre

MS Dhoni Statement on His Last Match At Chennai: मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने पहिल्या क्वालिफायर सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सला 15 धावांनी पराभूत केले. एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) झालेल्या या सामन्यात चेन्नईने विजय मिळवत अंतिम सामन्यातही प्रवेश केला आहे.

आता एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स तब्बल दहाव्यांदा रविवारी आयपीएलचा अंतिम सामना खेळताना दिसेल. दरम्यान, धोनीचा हा अखेरचा हंगाम असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. धोनीनेही याबद्दल स्पष्ट उत्तर यापूर्वी दिलेले नाही. त्यामुळे अद्यापही सर्वांकडून अंदाज व्यक्त होत आहेत.

दरम्यान, जर धोनीचा हा अखेरचा हंगाम असेल, तर मंगळवारी झालेला सामना धोनीचा चेन्नईतील अखेरचा सामना ठरेल. याचबद्दल सामन्यानंतर समालोचक हर्षा भोगले यांनी प्रेझेंटेशनमध्ये धोनीला प्रश्न विचारला.

भोगले यांनी धोनीला प्रश्न विचारला की पुढीलवर्षी तो चेन्नईत पुन्हा खेळायला येणार आहे का? त्यावर धोनीने उत्तर दिले की 'मला माहित नाही, माझ्याकडे अजून 8-9 महिने आहेत निर्णय घ्यायला. डिसेंबरच्या जवळपास एक छोटा लिलाव होईल. त्यामुळे आत्ताच डोकेदुखी कशाला करून घ्यायची.'

'माझ्याकडे अजून बराच काळ आहे विचार करायला. पण मी नेहमीच चेन्नई सुपर किंग्सबरोबर नेहमी असेल, मग ते त्यांच्यासाठी खेळत असो किंवा मी बाहेर बसलेला असो. मी घरापासून जानेवारीपासून लांब आहे. मार्चपासून सराव करत आहे. हा मोठा निर्णय आहे, पण माझ्याकडे अजून विचार करायला बराच वेळ आहे.'

दरम्यान, धोनीने ही प्रतिक्रिया देत त्याने अद्याप निवृत्तीबद्दल विचार केलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबरोबरच त्याने असेही स्पष्ट केले आहे की जरी तो खेळला नाही, तरी तो चेन्नई संघाबरोबर नेहमीच असेल.

चेन्नई दहाव्यांदा अंतिम सामन्यात

मंगळवारी चेन्नईने गुजरातला हरवल्याने दहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. चेन्नईने यापूर्वी 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2015, 2018, 2019 आणि 2021 या वर्षीही आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे. यातील 2010, 2011, 2018 आणि 2021 यावर्षी विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

SCROLL FOR NEXT