Neeraj Chopra
Neeraj Chopra Dainik Gomantak
क्रीडा

गोल्डन बॉय नीरज चोप्राने लग्नासाठी अखेर 'परफेक्ट चॉईस' सांगितली

दैनिक गोमन्तक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) सुवर्ण जिंकल्यानंतर नीरज चोप्राचे (Neeraj Chopra) चाहते सोशल मिडियावर त्याच्या गर्लफ्रेंड नाव शोधत आहे, तर कोणी त्याच्या लग्नाच्या नियोजनाबद्दल जाणून घेऊ इच्छित आहे. आतापर्यंत अनेक मुलाखतींमध्ये नीरजला विचारण्यात आले आहे की, तो कधी लग्न करणार आहे. तथापि, लवकरच किंवा नंतर अस म्हणत असतानाच गोल्डन बॉयने चाहत्यांना अखेर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

नीरज चोप्रा लवकरच डान्स प्लस (Dance Plus) 6 शोमध्ये दिसणार आहे. त्याच्या प्रोमोचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात शो होस्ट करणारा राघव जुयाल (Raghav Juyal) महिला चाहत्यांच्या वतीने नीरजला प्रश्न विचारत आहे की, तुझी कुंडली कशी जुळवायची. हा प्रश्न ऐकून नीरज थोडा लाजला आणि हसत असताना म्हणाला की, मला याविषयी काहीच कल्पना नाही. मात्र त्याच्या प्रश्नांची ही मालिका इथेच थांबली नाही. शोचा एक भाग असलेला पुनीत पाठक (Puneet Pathak) नीरजला म्हणाला की, सर्व मुलींच्या वतीने, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की, तुम्हाला कशी मुलगी आवडेल? या प्रश्नावर, तिथे बसलेले सर्व स्पर्धक हसत हसत नीरजच्या 'गोल्डन वर्ड्स' ची आतुरतेने वाट पाहू लागले.

नीरज उत्तर देण्याआधीच राघव त्याच्या वतीने गमतीने म्हणाला, 'जेवलिनसारखी आवडेल' यावर नीरज म्हणाला, 'सध्या असे काही नाही. परंतु मी एक खेळाडू असल्याने तीही एक खेळाडूच असावी अशी माझी इच्छा आहे. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत असावी तसेच इतरांचा आदर करणारी असावी आणि महत्त्वाचे म्हणजे कुटुंबाचा आदर करणारी असावी.

फीमेल फॅन्सकडून गोल्डन बॉयला सध्या खूप अटेंशन मिळत आहे. इंडिया टुडे मॅगझिनने आपल्या कव्हर पेजवर नीरज चोप्राला स्थान दिले आहे. त्याने स्वतः इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमधून ही माहिती दिली आहे. अमेरिकन अभिनेत्री सामंथा स्टीफनने (Samantha Stephen) नीरज चोप्राच्या या पोस्टवर आपली प्रतिक्रियाही दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

SCROLL FOR NEXT