Shrungi Bandekar Dainik Gomantak
क्रीडा

Shrungi Bandekar: गोव्याच्या श्रुंगीला आणखी एक राष्ट्रीय पदक, 400 मीटर मेडलीत ब्राँझची मानकरी

श्रुंगीने 76 व्या राष्ट्रीय सीनियर जलतरण स्पर्धेत वैयक्तिक दुसरे ब्राँझपदक जिंकले.

किशोर पेटकर

Shrungi Bandekar: गोव्याच्या श्रुंगी बांदेकर हिने 76व्या राष्ट्रीय सीनियर जलतरण स्पर्धेत बुधवारी शेवटच्या दिवशी वैयक्तिक दुसरे पदक जिंकले. स्पर्धेत दुसऱ्यांदा ब्राँझ पदकाची मानकरी ठरताना तिने महिलांच्या 400 मीटर मेडलीत तिसरा क्रमांक पटकावला.

हैदराबाद येथे झालेल्या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी श्रुंगीने 400 मीटर मेडली शर्यतीत 5 मिनिटे 17.92 सेकंद वेळ नोंदविली. कर्नाटकाच्या एस. लक्ष्या हिने 5 मिनिेटे 10.93 सेकंद वेळेसह सुवर्णपदक, तर रिचा मिश्रा हिने 5 मिनिटे 15.79 सेकंद वेळेसह रौप्यपदक प्राप्त केले.

स्पर्धेच्या पात्रता फेरीत श्रुंगीने 5 मिनिटे 28.22 सेकंद वेळेसह मुख्य फेरी गाठली होती. त्यावेळी तिची वेळ चौथ्या क्रमांकाची होती. अंतिम फेरीत गोव्याच्या अव्वल जलतरणपटूने कामगिरीत भरपूर सुधारणा करताना पोडियम फिनिश मिळविले.

वैयक्तिक दुसरे पदक

श्रुंगीने 76 व्या राष्ट्रीय सीनियर जलतरण स्पर्धेत वैयक्तिक दुसरे ब्राँझपदक जिंकले. या स्पर्धेत अगोदर 200 मीटर मेडली शर्यतीत तिला तिसऱ्या क्रमांकाचे पदक मिळाले होते. श्रुंगीने बुधवारी 200 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीतही अंतिम फेरी गाठली होती, पण सातव्या क्रमांकामुळे तिला या शर्यतीत पदक मिळाले नाही.

गतवर्षी गुवाहाटी येथे झालेल्या 75vव्या राष्ट्रीय सीनियर स्पर्धेत श्रुंगीने 400 मीटर मेडलीत रौप्यपदकाची कमाई केली होती. बंगळूर येथे प्रशिक्षक भूषण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रुंगी सराव करते.

गोव्याला एकूण तीन पदके

गोव्याने हैदराबादमध्ये झालेल्या स्पर्धेत एकूण तीन ब्राँझपदके जिंकली. महिला गटात श्रुंगीच्या दोन ब्राँझपदकांव्यतिरिक्त पुरुषांच्या 50 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत झेवियर डिसोझा याने मंगळवारी तिसरा क्रमांक मिळवून पदकप्राप्ती केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

SCROLL FOR NEXT