Indian Masters Badminton Dainik Gomantak
क्रीडा

Indian Masters Badminton: गोव्याच्या संध्या, आशुतोष यांनी पटकावले सुवर्णपदक

अनुक्रमे महिला, मिश्र दुहेरीत विजेतेपदाचा मान

किशोर पेटकर

Indian Masters Badminton: गोव्याच्या संध्या मेलाशीमी व आशुतोष पेडणेकर यांनी नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या 45व्या इंडियन मास्टर्स (व्हेटरन्स) राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.

संध्या हिने कर्नाटकच्या संगीता मारी हिच्या साथीत महिलांच्या 35+ वयोगटातील दुहेरीत विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत संध्या व संगीता जोडीने जे. अनीस कोवसर (तमिळनाडू) मनाली सिन्हा (आसाम) जोडीला 18-21, 21-18, 21-15असे नमविले.

आशुतोषने महाराष्ट्राच्या नाहीद दिवेचा याच्यासमवेत खेळताना 50+ वयोगटातील मिश्र दुहेरीत अंतिम सामना जिंकला. या जोडीने विजेतेपद पटकावताना किरण माकोडे (महाराष्ट्र) व रुचिता शर्मा (मध्य प्रदेश) जोडीला 22-20, 21-19असे हरविले.

पुरुष व महिला, मिश्र दुहेरीतील बक्षीस वितरण राज्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते झाले. त्यांनी यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन करताना व्हेटरन्स खेळाडूंची खडतर मेहनत व समर्पित वृत्तीचे कौतुक केले.

स्पर्धेतील प्रमुख दुहेरी विजेते ः जे. बी. एस. विद्याधर व सनावे थॉमस (40+ पुरुष), सनावे थॉमस व नुपुरा गाडगीळ (40+ मिश्र), के. ए. अनीश व विजय लॅन्सी (45+ पुरुष), श्रीदेवी गाधिली व रुचिता शर्मा (50+ महिला), समीर अब्बासी व पूजा मेहता (45+ मिश्र).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT