Pearl Fernandes Dainik Gomantak
क्रीडा

Pearl Fernandes: गोव्याची पर्ल भारतीय फुटबॉल संघात; देशासाठी अभिमानास्पद कामगिरीचा संकल्प

किशोर पेटकर

India Under 16 Girls Football Team:

गोव्याची प्रतिभाशाली युवा महिला फुटबॉलपटू पर्ल फर्नांडिस हिची भारताच्या 16 वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल संघात निवड झाली. पंधरा वर्षीय पर्ल हरमल येथील असून गोवा फुटबॉल विकास मंडळाची (जीएफडीसी) प्रशिक्षणार्थी आहे. भारतीय संघ नेपाळमध्ये 1 ते 10 मार्च या कालावधीत होणाऱ्या दक्षिण आशिया फुटबॉल महासंघाच्या (सॅफ) 16 वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत खेळणार आहे. त्यानिमित्त जाहीर झालेल्या भारतीय संघात पर्ल हिला प्रथमच संधी मिळाली.

दरम्यान, भारताच्या 16 वर्षांखालील मुलींच्या संघात निवड झाल्याबद्दल पर्ल हिने आनंद व्यक्त केला. फुटबॉल मैदानावर गुणवत्ता प्रदर्शित करताना देशासाठी अभिमानास्पद कामगिरी बजावण्याचा संकल्प तिने केला आहे. तिने जीएफडीसी, प्रशिक्षक, पालकांचे आभार मानले आहेत.

दुसरीकडे, पर्ल हिला जीएफडीसीचे प्रशिक्षक आनुन्सियासाव (आन्सू) रॉड्रिग्ज, दिएतमार फर्नांडिस, जेसन फर्नांडिस, जीएफडीसी हरमल केंद्र प्रमुख जेरोनिमो फर्नांडिस यांचे मार्गदर्शन लाभते. हरमल येथील अवर लेडी ऑफ माऊंट कार्मेल हायस्कूलमध्ये पर्ल नवव्या इयत्तेत शिकते. राष्ट्रीय पातळीवर तिने गोव्याचे 14 आणि 17 वर्षांखालील वयोगटात प्रतिनिधित्व केले असून गोवा फुटबॉल असोसिएशनने तिला 2023 मधील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवले. जीएफडीसी सदस्य सचिव गीता नागवेकर यांनी भारतीय संघात निवड झालेल्या पर्लचे अभिनंदन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

वेलिंगकरप्रकरणी 'लुकआऊट नोटीस' जारी! हिंदुत्ववादी संघटनांचे समर्थन; पोलिसांची पथके मागावर

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

SCROLL FOR NEXT