Ranji Trophy Dainik Gomantak
क्रीडा

Ranji Trophy 2022: गोव्याची सलामी ओडिशाशी

रणजी करंडक (Ranji Trophy) क्रिकेट स्पर्धेतील गोव्याच्या मोहिमेस 17 फेब्रुवारीपासून सुरवात होणार आहे. एलिट ड गटात त्यांचा पहिला सामना ओडिशाविरुद्ध होईल, नंतर 41 वेळचा विजेता मुंबई व गतविजेता सौराष्ट्रविरुद्ध सामने होतील.

किशोर पेटकर

पणजी : रणजी करंडक (Ranji Trophy) क्रिकेट स्पर्धेतील गोव्याच्या मोहिमेस 17 फेब्रुवारीपासून सुरवात होणार आहे. एलिट ड गटात त्यांचा पहिला सामना ओडिशाविरुद्ध होईल, नंतर 41 वेळचा विजेता मुंबई व गतविजेता सौराष्ट्रविरुद्ध सामने होतील. या गटातील सर्व सामने अहमदाबाद (Ahmedabad) येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम (Narendra Modi Cricket Stadium) संकुलात खेळले जातील. गोव्याचा संघ गुरुवारी विलगीकरणासाठी अहमदाबाद येथे दाखल होईल. त्यानंतर 14 फेब्रुवारीपर्यंत पाच दिवसीय विलगीकरण प्रक्रिया असेल. 15 व 16 रोजी संघासाठी सराव सत्र असेल, असे गोवा क्रिकेट सूत्राने सांगितले. (Goas Campaign For The Ranji Trophy Cricket Tournament Will Start On February 17)

कोविडमुळे 2020-21 मोसमात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा झाली नव्हती. 2020-21 मोसमातील स्पर्धा 13 जानेवारीपासून खेळली जाणार होती, परंतु कोविडच्या तिसऱ्या लाटेमुळे स्पर्धा लांबणीवर गेली आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला नव्याने स्पर्धेचे नियोजन करावे लागले. त्यामुळे साखळी फेरीत प्रत्येक संघ तीन सामने खेळेल.

गोव्याचे वेळापत्रक

- तारीख 17 ते 20 फेब्रुवारी : विरुद्ध ओडिशा

- तारीख 24 ते 27 फेब्रुवारी : विरुद्ध मुंबई

- तारीख 3 ते 6 मार्च : विरुद्ध सौराष्ट्र

प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध गोवा

- विरुद्ध ओडिशा : 3 सामने, 2 पराभव , 1 अनिर्णित

- विरुद्ध सौराष्ट्र : 4 सामने, 1 विजय, 1 पराभव, 2 अनिर्णित

- विरुद्ध मुंबई : प्रथमच खेळणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT