Anura Prabhudesai Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याच्या अनुराचे रेल्वे बॅडमिंटन स्पर्धेत यश

दोन रौप्य व एक ब्राँझपदकाची केली कमाई

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अनुरा प्रभुदेसाई हिने रेल्वे बॅडमिंटन स्पर्धेत यश संपादन केले आहे. फोंड्याच्या या खेळाडूने 68 व्या अखिल भारतीय रेल्वे बॅडमिंटन स्पर्धेत दोन रौप्य व एक ब्राँझपदक जिंकले. ही स्पर्धा विशाखापट्टणम येथे झाली या स्पर्धेदरम्यान तीने ही कामगिरी केली आहे.(Goa's Anura's success in Railway Badminton Tournament

अनुराने या स्पर्धेत उत्तर रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व केले. ती जीनो फार्मास्युटिकल्सची ‘सदिच्छा दूत’ आहे. अनुराचा सहभाग असलेल्या उत्तर रेल्वे संघाने सांघिक गटातील अंतिम फेरी गाठली. पश्चिम-मध्य रेल्वे संघाकडून हार स्वीकारल्यामुळे अनुराच्या संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या लढतीत अनुराने एकेरीतील विजय मिळविला.

तिने श्रेयांशी परदेशी हिला 21-19, 25-23 असे हरविले. महिलांच्या दुहेरीत अनुराने कनिका कंवल हिच्यासह भाग घेतला. त्यांना श्रेयांशी परदेशी व भारती पाल जोडीकडून 16-21, 21-14, 13-21 असा पराभव स्वीकारावा लागला. अनुराने वैयक्तिक एकेरीतही अंतिम फेरी गाठली. सुवर्णपदकाच्या लढतीत तिला श्रेयांशी परदेशी हिच्याकडून 21-11, 21-18 फरकाने पराभव पत्करावा लागला त्यामुळे ती रौप्यपदकाची मानकरी ठरली.

त्यापूर्वी अनुराने उपांत्यपूर्ल लढतीत वैष्णवी भाले हिला, तर उपांत्य लढतीत रिया मुखर्जी हिला हरविले होते. मिश्र दुहेरीत बोधित जोशी याच्यासह खेळताना अनुराला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य लढतीत त्यांना श्रेयांशी परदेशी व चिराग सेन जोडीकडून 21-8, 21-15 असा पराभव पत्करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT