Bronz Medal winner Ram Dhawaskar And Aron Parera  Dainik Gomantak
क्रीडा

Bronz For Goa In Beach Volleyball: बीच व्हॉलिबॉलमध्ये गोव्याला ब्राँझपदक

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; राम-अॅरोन जोडीचे यश, गोव्याचे एकंदरीत तिसरे पदक

गोमन्तक डिजिटल टीम

Bronz For Goa In Beach Volleyball: पणजी : गुजरातमधील ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बीच व्हॉलिबॉल स्पर्धेत गोव्याला रविवारी ब्राँझपदकाचे समाधान लाभले. राम (पप्पू) धावसकर व अॅरोन परेरा या जोडीने तिसऱ्या क्रमांका साठीच्या लढतीत गोव्याच्याच नितीन सावंत व सर्वेश नाईक जोडीवर २१-१९, २१-१४ असा विजय मिळविला.

गोव्याचे हे स्पर्धेतील एकूण तिसरे ब्राँझपदक ठरले. सूरतमधील दुमास समुद्रकिनारी बीच व्हॉलिबॉल स्पर्धा झाली. रविवारी सकाळी उपांत्य फेरीत गोव्याच्या दोन्ही जोड्या पराभूत झाल्या. त्यामुळे त्यांना ब्राँझपदकाच्या लढतीत खेळावे लागले.

उपांत्य फेरीत राम-अॅरोन जोडीवर तेलंगणाच्या जोडीने २१-१५, १६-२१, १५-८ फरकाने मात केली, तर आंध्र प्रदेशच्या जोडीने नितीन-सर्वेश जोडीस २२-२०, २१-१९ असे हरविले. यामुळे स्पर्धेत सुवर्ण किंवा रौप्यपदक जिंकण्याचे गोव्याचे स्वप्न भंगले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT