Goa women's victory in T20 cricket tournament Dainik Gomantak
क्रीडा

टी-20 क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या महिलांची विजयी कूच

सांघिक खेळाच्या बळावर उत्तराखंडला नमविले

Kishor Petkar

T-20 : गोव्याच्या महिलांनी विजयी कूच कायम राखताना मंगळवारी सीनियर गट टी-20 क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा सामना जिंकला. त्यांनी शानदार सांघिक खेळाच्या बळावर उत्तराखंडला आठ विकेट्स व दहा चेंडू राखून पराभव केला. (Goa women's victory in T20 cricket tournament)

पंजाबमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग स्टेडियमवर सामना झाला. उत्तराखंडने काल बडोद्याला नमविले होते, पण गोव्याने त्यांना अजिबात संधी दिली नाही. गुजरातला चार विकेट्स राखून हरविलेल्या गोव्याने उत्तराखंडला 8 बाद 85 असे रोखले, नंतर 18.2 षटकांत 2 बाद 87 धावा करून सामना जिंकला.

गोव्याच्या डावात पूर्वजा वेर्लेकर हिने सर्वाधिक 31 धावा केल्या. तिने श्रेया परब (11) हिच्या साथीत 31 धावांची सलामी दिली. नंतर पूर्वजा व तेजस्विनी दुर्गड (नाबाद 23) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केल्यानंतर तेजस्विनीने निकिता मळीक (नाबाद 13) हिच्या साथीत गोव्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक

उत्तराखंड : 20 षटकांत 8 बाद 85 (ए. एन. तोमर 14, सारिका कोली 20, रीमा जिंदाल 24, नीलम 10, शिखा पांडे 1-9, निकिता मळीक 1-2, मेताली गवंडर 0-8, सुनंदा येत्रेकर 2-16, पूर्वा भाईडकर 0-20, रुपाली चव्हाण 3-20, तेजस्विनी दुर्गड 1-10) पराभूत वि. गोवा : 18.2 षटकांत 2 बाद 87 (पूर्वजा वेर्लेकर 31, श्रेया परब 11, तेजस्विनी दुर्गड नाबाद 23, निकिता मळीक नाबाद 13, प्रेमा 2-13).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT