Shikha Pandey Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याची मदार अनुभवी खेळाडूंवर

सीनियर महिला क्रिकेट संघ कर्णधारपदी शिखा पांडे कायम

Dainik Gomantak

Goa Women's Cricket: आगामी सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट (Women's ODI Cricket) स्पर्धेत गोव्याची मदार अनुभवी खेळाडूंवर असेल. स्पर्धेसाठी 20 सदस्यीय संघ निवडण्यात आला असून कसोटी अष्टपैलू शिखा पांडे हिच्याकडे कर्णधारपद (Captain Shikha Pandey) कायम ठेवण्यात आले.

ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून शिखा गोव्याच्या संघात दाखल झाली आहे. विशाखापट्टणमला जाणाऱ्या संघात सुनंदा येत्रेकर, रूपाली चव्हाण, विनवी गुरव, संजुला नाईक, तेजस्विनी दुर्गड, निकिता मळीक, पूर्वजा वेर्लेकर या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय 19 वर्षांखालील स्पर्धेत प्रभावी कामगिरी केलेल्या इब्तिसाम शेख, सावली कोळंबकर, मिताली गौंडर, तनया नाईक खेळाडूंचीही निवड करण्यात आली आहे.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे (GCA) प्रशिक्षण-क्रिकेट कार्यवाही संचालक प्रकाश मयेकर, महिला क्रिकेट प्रतिनिधी संगीता माझरेकर, निवड समिती अध्यक्ष डेझी डिसोझा, सदस्य कृत्तिका नाईक, लिझेट वाझ, संघाचे मुख्य प्रशिक्षक अनंत तांबवेकर यांची बैठक मंगळवारी झाली, त्यावेळी स्पर्धेसाठी संघ निवडण्यात आला.

मोहीम 31 पासून

गोव्याचे सामने आंध्र प्रदेशमधील विखाखापट्टणम आणि विझियानगरम येथे खेळले जातील. विलगीकरण प्रक्रिया 23 ऑक्टोबरपासून सुरू होईल, तर सामने 31 ऑक्टोबरपासून सुरू होतील. एलिट ड गटात गोव्यासह विदर्भ, हरियाना, मध्य प्रदेश, गुजरात व मिझोराम हे संघ आहेत.

गोव्याचा महिला संघ

शिखा पांडे (कर्णधार), विनवी गुरव, तेजस्विनी दुर्गड, संजुला नाईक, इब्तिसाम शेख, सुनंदा येत्रेकर, निकिता मळीक, रूपाली चव्हाण, सावली कोळंबकर, श्रेया परब, सोनाली गौंडर, पूर्वा भाईडकर, पूर्वजा वेर्लेकर, दीक्षा आमोणकर, दिव्या नाईक, सिया फळदेसाई, मंजुश्री भगत, सेजल सातार्डेकर, मिताली गौंडर, तनया नाईक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT