National Women's Football Tournament Dainik Gomantak
क्रीडा

National Women's Football Tournament: गोव्याच्या महिला संघाला जोरदार धक्का

राष्‍ट्रीय सीनियर फुटबॉल: हिमाचल प्रदेशने चार गोलने नमविले

Ganeshprasad Gogate

National Senior Women's Football Tournament: राष्ट्रीय सीनियर महिला फुटबॉल स्पर्धेची मुख्य फेरी गाठण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या गोव्याच्या संघाला बुधवारी जोरदार धक्का सहन करावा लागला.

गट तीनमध्ये हिमाचल प्रदेशने एकतर्फी लढतीत 4-0 असा चमकदार विजय नोंदविला. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सामना झाला.

या गटातील आणखी एका सामन्यात ओडिशाने राजस्थानचा 12-0 असा धुव्वा उडवून अव्वल स्थान मिळविले. ओडिशाचे आता तीन लढतीनंतर दोन विजय व एका बरोबरीसह सात गुण झाले आहेत.

राजस्थानला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. ओडिशाच्या विजयात जसोदा मुंडा हिने चार, मालती मुंडा व बान्या कबिराज यांनी प्रत्येकी दोन, निकेता बिशी, भारती दास, श्रीजना तमांग व सुमित्रा हेमब्रम यांना प्रत्येकी एक गोल केला.

मागील लढतीत दोन गोलच्या पिछाडीवरून ओडिशाला 3-3 असे गोलबरोबरीत रोखलेल्या हिमाचल प्रदेशने बुधवारी सकाळी गोव्याला निष्प्रभ केले. रिया शर्मा हिने 11 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे विश्रांतीला हिमाचलचा संघ एका गोलने आघाडीवर होता.

नंतर उत्तरार्धात निशा हिने 50 व्या, रितू देवी हिने 67 व्या, तर अंजू हिने 81 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे हिमाचल प्रदेशने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. अन्य एका बरोबरीमुळे त्यांचे दोन लढतीतून चार गुण झाले आहेत.

अगोदरच्या लढतीत राजस्थानला तीन गोलने नमविलेल्या गोव्याचा हा पहिला पराभव ठरला. त्यामुळे त्यांचे दोन सामन्यानंतर तीन गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT