Goa Sports : गोव्याचा युवक संघ बाद फेरीत  Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याचा युवक संघ बाद फेरीत

25 वर्षांखालील वन-डे: पुदुचेरीतील पावसामुळे पंजाबविरुद्धचा सामना रद्द, गटात दुसरा क्रमांक

दैनिक गोमन्तक

पणजी Goa Sports : गोव्याच्या (Goa) युवक क्रिकेट संघाला 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट (Cricket)स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश मिळाला. पुदुचेरी येथील पावसामुळे एलिट ब गटातील तिन्ही सामने शुक्रवारी रद्द झाले. त्यामुळे सर्व संघांना प्रत्येकी दोन गुण मिळाले. त्यात पंजाबने सर्वाधिक 16 गुणांसह गटात अव्वल स्थान मिळवून उपांत्यपूर्व, तर गोव्याने 12 गुणांसह उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.

गोवा आणि पंजाब यांच्यातील शेवटचा साखळी सामना शुक्रवारी होणार होता, पण पावसामुळे सामन्यात एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. या गटातील हरियाना, राजस्थान, दिल्ली व रेल्वे या संघांचे प्रत्येकी आठ गुण झाले. त्यांचे आव्हान साखळी फेरीत आटोपले. स्पर्धेची बाद फेरीत 3 डिसेंबरपासून बंगळूर येथे खेळली जाईल. गोव्याचा संघ आता विलगीकरणासाठी पुदुचेरी येथून थेट बंगळूरला रवाना होईल.

स्पर्धेत गोव्याचे दोन विजय

गोव्याचे एलिट ब गटातील रेल्वे व पंजाबविरुद्धचे सामने पावसामुळे रद्द झाले. या दोन्ही लढतीत गोव्याला प्रत्येकी दोन गुण मिळाले. विजय मिळविलेल्या लढतीत गोव्याने हरियानास 6 विकेटने, तर दिल्लीस 5 विकेटने हरविले. राजस्थानविरुद्ध 103 धावांनी पराभव पत्करावा लागला.

सुयश पुढील सामना खेळणार

गोव्याचा कर्णधार सुयश प्रभुदेसाई याची सीनियर गटातील विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत निवड पक्की आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेच्या एलिट ई गटात गोव्याचे सामने झारखंडमधील रांची येथे 8 डिसेंबरपासून खेळले जातील. त्यापूर्वी नियमानुसार संघाचे विलगीकरण असेल. 25 वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेत गोव्याचा उपउपांत्यपूर्व सामना 3 डिसेंबरला होईल. गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव विपुल फडके यांच्या माहितीनुसार, सुयश उपउपांत्यपूर्व सामना खेळून सीनियर संघात दाखल होईल. फॉर्ममधील सुयश गोव्याचा फलंदाजीतील आधारस्तंभ आहे. 25 वर्षांखालील स्पर्धेत त्याने दिल्लीविरुद्ध नाबाद 58, तर राजस्थानविरुद्ध नाबाद 94 धावा केल्या.

गोव्याची लढत तमिळनाडूशी

उपउपांत्यपूर्व फेरीत गोव्याचा सामना येत्या 3 डिसेंबरला तमिळनाडूविरुद्ध बंगळूर येथील अळूर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

Goa Politics: 'आरजी'कडून निलंबित खोलकरांना चौकशीसाठी नोटीस; 7 ऑगस्‍टला हजर राहण्‍याचे निर्देश

SCROLL FOR NEXT