Goa Professional League teams captain Dainik Gomantak
क्रीडा

Goa Professional League: गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेत यंदा 156 सामने

रविवारपासून सुरवात; चार नव्या संघांसह एकूण 13 संघांत चुरस

किशोर पेटकर

Goa Professional League Football Matches: गोवा फुटबॉल असोसिएशनची (जीएफए) प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धा रविवारपासून (ता. 27) खेळली जाईल. स्पर्धेत चार नव्या संघांसह यंदा एकूण 13 संघांत चुरस असेल आणि आठ ते नऊ महिन्यांच्या कालावधीत एकूण 156 सामने खेळले जातील.

‘सीएएम इंडस्ट्रीज’तर्फे पुरस्कृत स्पर्धेची घोषणा शनिवारी पत्रकार परिषदेत जीएफए अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी केली. प्रोफेशनल लीग स्पर्धेत सर्वाधिक 13 संघ सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे कायतान सांगितले.

पुढील वर्षी संघांची संख्या १४ असेल. गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाल्यानंतर प्रो-लीग स्पर्धेतील सामने धुळेरव्यतिरिक्त राज्यातील इतर भागातही खेळले जातील, असेही त्यांनी सांगितले.

स्पर्धेत गतविजेता धेंपो स्पोर्टस क्लब, उपविजेता स्पोर्टिंग क्लब द गोवा, एफसी गोवा, चर्चिल ब्रदर्स, कळंगुट असोसिएशन, सेझा फुटबॉल अकादमी, गार्डियन एंजल स्पोर्टस क्लब, वास्को स्पोर्टस क्लब, पणजी फुटबॉलर्स हे गतमोसमातील संघ, तसेच प्रथम विभागातील यंग बॉईज ऑफ टोंक (वायबीटी), साळगावकर एफसीच्या माघारीनंतर संधी मिळालेला कुठ्ठाळी व्हिलेजर्स यांच्यासह थेट प्रवेश देण्यात आलेले जीनो स्पोर्टस क्लब व पॅक्स ऑफ नागोवा या संघांचा स्पर्धेत समावेश आहे.

गेल्या रविवारी (ता. २०) मदतनिधी सामन्याद्वारे जीएफएच्या २०२३-२४ मोसमाची सुरवात झाली. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर स्पोर्टिंग क्लब द गोवा संघावर तीन गोलने मात करून धेंपो क्लबने मोसमाला विजयी सुरवात केली होती.

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेच्या २०२३-२४ मोसमातील पहिली लढत रविवारी (ता. २७) होईल. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर एफसी गोवा आणि चर्चिल ब्रदर्स या माजी विजेत्या संघांत सामना खेळला जाईल.

देशातील पहिली राज्य फुटबॉल संघटना

व्यावसायिक फुटबॉलमध्ये अत्यावश्यक असलेल्या क्लब परवाना निकषांची पूर्तता प्रोफेशनल लीग स्पर्धेतील सर्व संघांनी केलेली आहे, भारतीय फुटबॉलमधील हा मोठा टप्पा आहे.

प्रत्येक संघातील खेळाडूंनी किमान वेतन मिळावे यासाठी जीएफएने पुढाकार घेतला आहे. या निर्णयांची अंमलबजावणी करणारी गोवा फुटबॉल संघटना ही देशातील पहिली राज्य फुटबॉल संघटना असल्याचा दावा कायतान फर्नांडिस यांनी केला.

दृष्टिक्षेपात २०२३-२४ मधील स्पर्धा

  1. विजेत्या संघाला ६ लाख रुपये, उपविजेत्या संघाला ४ लाख रुपये

  2. प्रत्येक लढतीतील सामनावीरास २५०० रुपये

  3. प्रोफेशनल लीग विजेता संघ २०२४-२५ मधील आय-लीग तृतीय विभागीय स्पर्धेस पात्र

  4. स्पर्धेतील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT