पणजी: एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघाने गोवा प्रोफेशनल लीग (Goa Professional League) फुटबॉल स्पर्धेत कळंगुट असोसिएशनवर 3-1 फरकाने दणदणीत विजय प्राप्त केला. सामना गुरुवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.
ब्रायसन फर्नांडिसने (bryson fernandez) 17 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे एफसी गोवा संघ विश्रांतीला एका गोलने आघाडीवर होता. नंतर 48 व्या मिनिटास हॅन्सेल कुएल्होच्या स्वयंगोलमुळे कळंगुटला बरोबरीचे समाधान लाभले. मात्र अखेरच्या वीस मिनिटांतील खेळात दोन गोल नोंदवून एफसी गोवाने विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. आदित्य साळगावकरने 71 व्या, तर वसीम इनामदार याने 79 व्या मिनिटास गोल केला. त्यामुळे एफसी गोवा संघ स्पर्धेत अपराजित राहू शकला.
आक्रमक सुरवात केलेल्या एफसी गोवास (fc goa) आघाडीसाठी जास्तवेळ प्रतीक्षा करावी लागली नाही. मेव्हन डायसच्या असिस्टवर ब्रायसनने अचूक नेम साधला. 21 व्या मिनिटास कळंगुटला बरोबरीची नामी संधी होती, परंतु गणेश ठाकूरच्या असिस्टवर चैतन दाभोळकरला चेंडूला योग्य दिशा दाखविणे जमले नाही. विश्रांतीनंतरच्या तिसऱ्या मिनिटास एफसी गोवाच्या हॅन्सेलच्या बॅकपासचा अंदाज चुकला व कळंगुटच्या खाती गोलची नोंद झाली. त्यानंतर कळंगुटचा जेस्लॉय नेटसमोर कोणीही नसताना गडबडला आणि त्यांची आणखी एक संधी वाया गेली. सामन्यातील 19 मिनिटे बाकी असताना ब्रायसनच्या स्केअर पासवर गोलक्षेत्रातून आदित्यने भेदक फटका मारल्यामुळे एफसी गोवास आघाडी घेता आली. नंतर वसीमने आघाडी व विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.