Kirtikesh Gadekar Dainik Gomantak
क्रीडा

Goa Professional Football League : धेंपोची वास्को क्लबवर मात

Goa Professional Football League : सामन्यातील पाच मिनिटे बाकी असताना बदली खेळाडू कीर्तीकेश गडेकर याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत धेंपो स्पोर्टस क्लबने वास्को स्पोर्टस क्लबवर 2-1 फरकाने मात केली. सामना रविवारी बाणावली येथील मैदानावर झाला.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर माजी विजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने सेझा फुटबॉल अकादमीला 1-0 फरकाने पराजित केले. 23व्या मिनिटास लॉईड कार्दोझ याने नोंदविलेला गोल निर्णायक ठरला. लॉईड सामन्याचा मानकरी ठरला.

बाणावली येथे पेद्रू गोन्साल्विस याने 21व्या मिनिटास धेंपो क्लबला आघाडी मिळवून दिली. 45+2व्या मिनिटास नायजेरियन खेळाडू ओडिली फेलिक्स चिदी याच्या गोलमुळे वास्को क्लबला बरोबरी साधता आली. सामन्यातील 19 मिनिटांचा खेळ बाकी असताना प्रशिक्षक समीर नाईक यांनी कीर्तीकेशला मैदानात उतरविले. ‘सुपर सब’ खेळाडूने 85व्या मिनिटास धेंपो क्लबला 2-1 अशी आघाडी मिळवून देणारा गोल नोंदविला आणि त्या बळावर त्यांनी स्पर्धेतील सलग दुसरा विजय प्राप्त केला. कीर्तीकेश सामन्याचा मानकरी ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT